महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Restrictions In Maharashtra : मंत्रालयाचा कारभार पुन्हा ५० टक्क्यांवर, दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज - Maharashtra ministry 50 per cent attendance

राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. (New Rules Of Corona Restrictions) यामध्ये कामकाजाच्या ठिकाणी 100 उपस्थितीवर निर्बंध घातले आहेत. (New Rules Of Corona Restrictions In Ministry) आजपासून (दि. 10 जानेवारी)रोजी मंत्रालयात सकाळी 9 ते 2 आणि दुपारी 12 ते 4 या दोन शिफ्टमध्ये कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Jan 10, 2022, 12:15 PM IST

Updated : Jan 10, 2022, 4:40 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. (New Rules Of Corona Restrictions) कामकाजाच्या ठिकाणच्या हजेरी उपस्थितीवर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून मंत्रालयात सकाळी 9 ते 2 आणि दुपारी 12 ते 4 या दोन (New Restrictions For COVID-19 ) शिफ्टमध्ये कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. (Corona Restrictions In Ministry) दरम्यान, ऑनलाईन बैठकीवरही भर दिला जाणार आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

वर्क-फॉर्म होम संदर्भातील यंत्रणा मंत्रालयात अद्यावत नाही

मागील आठ दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. २० हजारपर्यंत असलेली रुग्णसंख्या ४४ हजारपर्यंत पोहचली आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने गर्दी नियंत्रणावर भर दिला आहे. त्यानुसार अनेक भागांत निर्बंध कठोर केले आहेत. मंत्रालयातील प्रवेशासाठीही काही नियम आहेत. तसेच, प्रशासकीय कामकाज ऑनलाइन करण्याच्या सूचना आहेत. परंतु, वर्क-फॉर्म होम संदर्भातील यंत्रणा मंत्रालयात अद्यावत नाही. निर्णय घेण्याबाबत ही अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामकाज करताना, गर्दी होणार नाही, असे नियोजन प्रशासनाने आखले आहे. त्यानुसार दोन शिफ्टमध्ये कारभार चालवला जाणार आहे.

सध्या कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मंत्र्याची बंगले बंद ठेवण्याच्या सूचना

तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्येचा आलेख चढता राहिला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्याचा गाडा जेथून हाकला जातो. त्या मंत्रालय परिसरात मंत्र्यांचे बंगले आहेत. अनेक मंत्री कोरोना बाधित आहेत. त्यामध्ये राज्यभरातून अनेकजण आपल्या व्यथा मांडण्यासाठी येथे येतात. सध्या कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मंत्र्याची बंगले बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही आपल्या सूचना ऑनलाइन पद्धतीने सरकार दरबारी मांडव्यात असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

काय आहे नियमावली

  • १. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.
  • २. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
  • ३. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
  • ४. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
  • ५. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
  • ६. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.
  • ७. जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.
  • ८. केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.
  • ९. जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
  • १०. प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील
  • ११. शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इतरवेळी ५० टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
  • १२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.
  • १३. नाट्यगृह आणि सिनेमागृह १२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
  • १४. आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार.
  • १५. राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.

हेही वाचा -ST Workers Strike : एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी बोलावली आज बैठक

Last Updated : Jan 10, 2022, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details