मुंबई - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( Covid Spread In Mumbai ) आहे. हा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांवर उपचार करताना पालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन केले. मुंबईत गेल्या दोन वर्षात तब्बल 1 कोटी 3 लाख 18 हजार 364 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले ( One Crore Patients Quarantined In Mumbai ) आहे. मुंबईत सुमारे 3 कोटी नागरिक ( Population Of Mumbai ) राहत असून त्यापैकी 30 टक्के नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार -मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली. गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीन लाटा वेळीच रोखण्यात पालिकेला यश आले आहे. 2 मे पर्यंत एकूण 10 लाख 59 हजार 970 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून 19 हजार 563 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
1 कोटी 3 लाख क्वारेंटाईन -कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची तापसणी करून त्यांना क्वारंटाईन केले जात आहेत. गेल्या दोन वर्षात एकूण 1 कोटी 3 लाख 25 हजार 887 नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. त्यापैकी 60 लाख 37 हजार 829 हाय रिस्क तर 42 लाख 88 हजार 58 लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत. एकूण 1 कोटी 3 लाख 25 हजार 887 पैकी 1 कोटी 3 लाख 18 हजार 364 नागरिकांनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. तर 7 हजार 523 नागरिक अद्यापही होम क्वारंटाईन आहेत.
झोपडपट्ट्या, इमारती सील मुक्त -गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबर 2021 ला मुंबईत तिसरी लाट आली. यावेळी 6 जानेवारीला 32 झोपडपट्टी आणि 508 इमारती सील होत्या. तिसरी लाट एकाच महिन्यात आटोक्यात आली. यामुळे 12 जानेवारीला एकही झोपडपट्टी सील नव्हती. यानंतर काही दिवसात इमारती सिलचे प्रमाणही शून्यावर आले Fआहे. सध्या रोजची रुग्णसंख्या 50 ते 100 च्या दरम्यान असल्याने एकही झोपडपट्टी किंवा इमारत सील नाही. मुंबईत आतापर्यंत एकूण 2798 झोपडपट्ट्या आणि चाळी तसेच 66 हजार 336 इमारती सीलमुक्त झाल्या आहेत.