मुंबई -पेट्रोल आणि डिझेलच्या भाव वाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. रोज नव्याने डिझेलसह पेट्रोल, गॅसचे भाव वाढत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ केली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात इंधन दर 4.50 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये 106. 19 पैसे तर डिझेलचा दर 94.92 पैसे इतका झाला आहे. पेट्रोलच्या मागोमाग आता डिझेलनेही मुंबईमध्ये शंभरी ओलांडली आहे. मुंबईत डिझेलने शंभरी ओलांडली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 112. 11 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर, डिझेलचा दर 102. 89 रुपये इतका झाला आहे.
पेट्रोलचे दर वाढतच आहेत
ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर इंधनाचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.50 रुपयांनी महाग झाले आहे. तर, डिझेल 4.70 रुपयांनी वाढले आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचे दर यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खूप मोठी वाढ झालेली आहे. विरोधकांनीही हा विषय धरून ठेवला होता. मात्र, त्याचा काहीही फायदा झाल्याचे दिसत नाही. पेट्रोलचे दर वाढतच आहेत. यामुळे दुचाकी आणि चारचाकीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
बाईक विकून टाकावी वाटते
मी एका खाजगी कंपनीत कामाला आहे माझा एक डोस झाल्यामुळे मला रेल्वेतून प्रवास करता येत नाही. यामुळे मला माझ्या दुचाकीचा वापर करावा लागतो. मात्र, पेट्रोलचे दर एवढे वाढल्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. कधीकधी वाटते बाईक विकून टाकावी अशी खंत अनिरुद्ध साळवे यांनी व्यक्त केली आहे.