मुंबई -क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party Case) केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) दिल्लीतील विशेष पथकाने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा नवी मुंबईतील RAF एनसीबी कार्यालयात जबाब नोंदला जात आहे. गेल्या सात तासांपासून एनसीबी विशेष पथकाकडून (NCB's special squad) जबाब नोंदने सुरू आहे. सायंकाळी 5 वाजता चौकशी सुरू झाली होती. आज 13 नोव्हेंबरला आर्यन खानचा वाढदिवस (Aryan Khan birthday) आहे. त्याच्या 24 व्या वाढदिवसाची सुरुवात ही एनसीबीच्या चौकशीतच झाली आहे.
दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी -
क्रुझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांनी एनसीबी कार्यालयात आज (शुक्रवारी) हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.
आर्यनची पुन्हा चौकशी सुरू