महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cruise Drug Case : जामीन मिळणार का? आर्यन खानच्या अर्जावर आज सुनावणी - etv bharat marathi

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज (13 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. कोर्डिलिया क्रूझ ड्रग प्रकरणात ३ ऑक्टोबरपासून आर्यन खान अटकेत आहे. जामिनासाठी आर्यनने सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

Aryan Khan
आर्यन खान

By

Published : Oct 13, 2021, 5:17 AM IST

मुंबई -अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज (13 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार हे आज स्पष्ट होणार आहे. कोर्डिलिया क्रूझ ड्रग प्रकरणात ३ ऑक्टोबरपासून आर्यन खान अटकेत आहे. जामिनासाठी आर्यनने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, एनसीबीने उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितल्याने मुंबई सत्र न्यायालयाने आज, बुधवारी सुनावणी ठेवली आहे.

हेही वाचा -आर्यन खान ड्रग केस प्रकरणातील एनसीबीचा मुख्य साक्षीदार एका गुन्ह्यात फरारी

किल्ला कोर्टाने केवळ सुनावणीच्या अधिकारक्षेत्राच्या मुद्द्यावर आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर आरोपी आर्यन खानबरोबरच अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सतिजा आणि मोहक जयस्वाल यांच्यातर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

  • काय आहे नेमके प्रकरण? -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना अटक केली होती. ७ ऑक्टोबरला आर्यन खानसह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार त्यांना आर्थर रोड जेल तसेच भायखळा महिला जेलमध्ये पाठवण्यात आले होते. या प्रकरणी अद्याप १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

  • अ‌ॅड अमित देसाई आर्यन खानची बाजू मांडणार-

आर्यन खानच्या सुटकेसाठी खान कुटूंबियांकडून प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. मात्र, सतीश मानेशिंदे आर्यनला जामीन मिळून देण्यात अपयशी ठरले. त्यानंतर आर्यनच्या जामिनासाठी खान कुटूंबियांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याशिवाय आर्यन खानची बाजू सत्र न्यायालयात सतीश मानेशिंदे मांडणार नसून त्यांच्या जागी अ‌ॅड अमित देसाई हे बाजू मांडणार आहेत.

हेही वाचा -Gauri Khan Birthday : आईच्या वाढदिवशी मुलाची भेट नाहीच; आर्यन खान जेलमध्ये क्वारंटाईन

ABOUT THE AUTHOR

...view details