मुंबई- क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला 2 ऑक्टोंबरला अटक केली होती. त्यानंतर तब्बल 27 दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. यावेळी न्यायालयाने काही अटींवर आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याचअनुषंगाने आर्यन आज एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे. आर्यनला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.