महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aryan Khan Released : अखेर 26 दिवसांनंंतर आर्यन खान ऑर्थररोड तुरुंगातून बाहेर

ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये गेल्या 25 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड तुरंगात अटकेत होता. ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली असून तो 'मन्नत'कडे रवाना झाला आहे.

Aryan Khan released
Aryan Khan released

By

Published : Oct 30, 2021, 11:33 AM IST

Updated : Oct 30, 2021, 6:04 PM IST

मुंबई -क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये गेल्या 25 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड तुरंगात अटकेत होता. ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली असून तो 'मन्नत'कडे रवाना झाला आहे. दरम्यान, काल आर्यन खानची जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात पोचली होती. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आर्यनला कालची रात्र तरुंगात काढावी लागली होती.

आर्यन खान तुरुंगाबाहेर

आर्यनच्या स्वागतासाठी 'मन्नत'वर रोषणाई -

आर्यन खानच्या स्वागतासाठी शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' लायटिंगने सजवण्यात आला आहे. काल शाहरुख आर्यनला घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलच्या दिशेला रवाना होणार होता. शाहरुख येणार म्हणून त्याला आणि त्याच्या मुलाला पाहण्यासाठी चाहत्यांनी ऑर्थर रोड जेलबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आज गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ऑर्थर रोड जेलबाहेर तैनात करण्यात आला होता.

रिपोर्ट

म्हणून आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला -

आर्यनच्या जामीनासाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार म्हणून सेशन कोर्टात शुक्रवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात आले होते. त्यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. तसेच जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली. यावेळी कोर्टात जुहीचे आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर करण्यात आले. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. पण जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्याने जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर झाला. नियमानुसार जामीनासाठी जामीनदाराचे दोन फोटो जरुरीचे असतात. पण दोन फोटो नसल्याने या प्रक्रियेला उशिर झाला. यावेळी कोर्टाने वकिलांना फटकारले. जामीनाची सर्व प्रक्रिया माहिती असताना जामीनदारांना त्याबाबत आधी माहिती देणे अपेक्षित होते, असे न्यायाधीशांनी वकिलांना सुनावले. त्यानंतर जुहीचे आणखी एक पासपोर्ट साईज फोटो मागविण्यात आला. मात्र, वेळ झाल्याने आर्यनला कालची रात्र तुरुंगात काढावी लागली.

आर्यन खान मन्नतवर

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?
वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले अरबाजकडे काही आहे का याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.

क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक
क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक हजर होते. असं असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचे सांगितले आहे. हा षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर कटाचा भाग आहे. जहाजावर कुणाच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत. त्यामुळे याला षडयंत्र म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्र भेटणार आहेत, तेथे त्यांना ड्रग्ज मिळणार आहे आणि मग ते ड्रग्जचं सेवन करणार आहेत अशी चर्चा नाही. त्यामुळेच हा कट आहे असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं.

'जहाजावर कोणत्याही भेटीगाठी नाही, त्यामुळे षडयंत्र म्हणता येणार नाही'
जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही. तेथे सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे. तिथं जाणीवपूर्वक ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असू शकतं. त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही, असंही मुकुल रोहतगी यांनी नमूद केलं.

Last Updated : Oct 30, 2021, 6:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details