महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...तर आर्यनची आजची रात्र सुद्धा तुरुंगातच! - एनडीपीएस न्यायालय

सायंकाळी 5 वाजल्यापासून कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून जामिनाच्या पेटीत सुटकेचा आदेश टाकला तर सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत आर्यन बाहेर येईल. या बॉक्समधून निघालेल्या रिलीझ ऑर्डरच्या आधारे तुरुंग अधिकारी आरोपींना सोडण्याची प्रक्रिया सुरू करतात. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आरोपीला सोडून दिले जाते.

आर्यन खान
आर्यन खान

By

Published : Oct 29, 2021, 2:25 PM IST

मुंबई - उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीन आदेशाची प्रत विशेष एनडीपीएस न्यायालयात जमा करावी लागते. विशेष NDPS न्यायालय आरोपीच्या नावावर रिलीज ऑर्डर जारी करते आणि सुरक्षेसाठी जामिनाची रक्कम किंवा वैयक्तिक बाँड तसेच इतर काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करते. हा सुटकेचा आदेश आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत टाकल्या नंतर पुढील कारवाईला सुरुवात होते.

...तर आर्यनची आजची रात्र सुद्धा तुरुंगातच!

सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल -

सायंकाळी 5 वाजल्यापासून कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून जामिनाच्या पेटीत सुटकेचा आदेश टाकला तर सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत आर्यन बाहेर येईल. या बॉक्समधून निघालेल्या रिलीझ ऑर्डरच्या आधारे तुरुंग अधिकारी आरोपींना सोडण्याची प्रक्रिया सुरू करतात. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आरोपीला सोडून दिले जाते.

शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर चाहत्यांनी केली गर्दी

आर्यन खानला मुंबई हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हा क्षण साजरा करण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी केली होती. जामीन आदेशानंतर, चाहत्यांनी शाहरुख खानच्या निवासस्थान मन्नत बाहेर जमण्यास सुरुवात केली जिथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी 20 पोलिस तैनात करण्यात आले होते. आर्यनला अटक झाल्यानंतर 20 दिवसांनंतर जामीन मिळाला. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी एनसीबीने आर्यनला अटक केली होती.

आरोपींना कोणत्या अटींवर जामीन?

साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

जामीनाला एनसीबीचा तीव्र विरोध

एनसीबीची केस अशी आहे की, आर्यनने एकप्रकारे जाणीवपूर्वक अमलीपदार्थ बाळगले होते. त्याचे अमलीपदार्थ विक्रेत्यांशी संबंध आहेत आणि अटकही वैध आहे. तो कटाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी केलीय. एनसीबीचा तपास अजून सुरु आहे. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांच्याकडून करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details