मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानवरील जामिनावर होणारी सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने काल बुधवार (दि.27) पुन्हा पुढे ढकलली. त्यावर आज गुरुवारी(दि.28) सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीनावर ही सुनावणी सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, वेळेत युक्तीवाद पुर्ण न झाल्याने सुनावणी पुढे ढकलली. दरम्यान, आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
...तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही?
या सुनावणीत एनसीबीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हे प्रकरण कोणत्याही षडयंत्राचे नसून व्यक्तीगत सेवनाच्या आरोपांचे आहे असे म्हणणे मांडले आहे. दरम्यान, ड्रग्ज सेवन झाले होते, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न एनसीबीकडे उपस्थित करण्यात आला आहे.
कायद्यानुसार अटकेसाठी वस्तूस्थिती नोंदवावी लागते
एनसीबीच्या अटक नोटीसीमध्ये मुद्दे वेगवेगळ्या स्वरुपाचे मांडण्यात आले आहेत. कायद्यानुसार अटकेसाठी वस्तूस्थिती नोंदवावी लागते. अटकेचा अधिकार समजून घेण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ५० समजून घ्यावे लागते. तसेच, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या अटकेबाबत माहिती दिली पाहिजे. आणि अटक करताना त्या व्यक्तीला जामिनाचा अधिकार असतो. भारतीय संविधानाचे कलम २२ हे कलम २१ मधील जीवनाचा अधिकारावर अवलंबून आहे. असही रोहतगी म्हणाले आहेत.
माहिती न देता माझी दिशाभूल करत आहेत