महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 28, 2022, 7:18 PM IST

ETV Bharat / city

Aryan Khan Drug case : आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्याने समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार

आर्यन खानला एसआयटीने क्लीनचिट ( NCB Sit Clean Cheat Aryan Khan ) दिल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर संशय निर्माण होत आहे. त्यामुळे समीन वानखेडेंची नोकरी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

sameer wankhede aryan khan
sameer wankhede aryan khan

मुंबई -एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करत वीस जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. यात प्रमुख नाव होतं ते बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान याचे. त्याला या पार्टीदरम्यान अटक करण्यात आली होती. आर्यन खानची ( Aryan Khan Drug Case ) अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर, या प्रकरणाला हाय प्रोफाईल केस म्हणून पाहिले गेले. या प्रकरणात तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. नंतर या प्रकरणाचा तपास दिल्लीतील एसआयटीला देण्यात आला. त्यातच आता शुक्रवारी आर्यन खानला एसआयटीने क्लीनचिट दिल्यानंतर समीर वानखेडे ( NCB Sit Clean Cheat Aryan Khan ) यांच्यावर संशय निर्माण होत असून, त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

आर्यनला सोडवण्यासाठी पैसे मागितले -आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडेंवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निशाणा साधला होता. समीर वानखेडेंनी केलेली कारवाई ही फर्जिवडा असल्याचे मलिकांनी म्हटले होते. तसेच, या प्रकरणातील साक्षीदार असलेला प्रभाकर साहिल यानी देखील समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खान कडून आर्यन खानला सोडविण्याकरिता पैसे मागितले असल्याचा आरोप केला होता. मात्र, हे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले होते.

'वानखेडेंवर कारवाई करावी' -आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर समीर वानखेंडेवर राज्यात पुन्हा विरोधाचा सूर पहायला मिळत आहे. वानखेडे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी केलेल्या कारवायांची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तर, नवाब मलिक यांनी देखील ट्विटवरुन समीर वानखेडेंवर टीका केली आहे. 'फर्जिवडा असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुन्हा नवाब मलिक यांनी केली आहे.

एसआयटीचा अहवाल काय सांगतो? -एसआयटीने दिलेल्या अहवालात अनेक बाबी अधोरेखित केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे समीर वानखेडे यांच्याकडून अनेक तांत्रिक चुका झाल्या असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आर्यन खान विरोधात कोणताही ठोस पुरावा तपासात आढळून आला नाही, असंही अहवालात म्हटलंय. एसआयटीनं दिलेल्या अहवालाची गंभीर दखल केंद्राकडून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारानं केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वानखेडेंची नोकरी जाणार? -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांची आता नोकरी जाणार का?, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, तूर्तास त्यांना पदावरुन हटवण्यात येण्याची शक्यता असल्याचं, केंद्र सराकरमधील सूत्रांनी म्हटले आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांची चौकशी केली जाईल. या चौकशीत जर वानखेडे यांनी सहकार्य केलं नाही आणि समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. इतकंच काय तर चौकशी समिती त्यांची पगारवाढ रोखण्यासोबत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील करु शकते. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या टीममधील अनेकांच्या अडचणीही वाढू शकतात, असेही बोललं जातंय. एनसीबीवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही चौकशी एसआयटीकडून केली जाते आहे. याप्रकरणात काही तत्थ आढळलं, तर त्याची चौकशी सीबीआयकडेही सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्याबाबत नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह - यापूर्वी एसआयटीच्या चौकशी अहवालातही मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या वानखेडे यांना एनसीबीतून हटवण्यात आले असून, त्यांची रवानगी त्यांचे मूळ केडर असलेल्या डीआरआयमध्ये करण्यात आलेली आहे. या एसआयटीच्या तपासात अनेकदा समीर वानखेडे यांची साक्षही नोंदवण्यात आलेली आहे. या प्रकरणात एसआयटीने या प्रकरणातील आरोपी, साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीही नोंदवलेल्या आहेत.

कारवाईतील आरोपी उच्च न्यायालयात -समीर वानखडे यांनी केलेल्या कारवाई मधील आरोपी मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याकरिता याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती या प्रकरणातील आरोपीचे वकील आली काशिफ खान देशमुख दिली आहे. आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो की करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे बोगस आहे. यात कुठलीही तथ्य नाही आहे. माझा याचिकाकर्ती मुनमुन दमजा यांच्याकडे अंमली पदार्थ सापडले असल्याचा दावा एनसीबी करत आहे. माझ्या याचिकाकर्त्याकडे फिजिकली कुठल्याही प्रकारचा अंमली पदार्थ सापडलेला नाही. ती ज्या रूममध्ये राहत होते त्या रूममध्ये इतर आणखी दोन जण राहत होते. एनसीबीने त्यांना न पकडता माझ्या क्लायंटला पकडले आणि त्यांच्यावर हा आरोप लावला आहे, असे देखील आली काशिफ खान देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Clean Chit Given to Aryan Khan : एनसीबीची कार्यपद्धती चुकीची, अधिकाऱ्यांना करावी शिक्षा : शिवसेना प्रवक्ते आंनद दुबेंची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details