महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ड्रग्ज प्रकरणातील आरोपींनी व्यवहारासाठी वापरलं डार्क नेट; एनसीबीकडून तपास - डार्क नेट

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला आणि त्याच्या मित्रांबद्दल एनसीबीने मोठा खुलासा झाला आहे. ड्रग्जशी संबंधित व्यवहारासाठी डार्क नेट वापरत असल्याचं तपासात उघड झालं आहे.

Aryan Khan Drug Case: NCB hints at use of darknet in drugs transaction
ड्रग्ज प्रकरणातील आरोपींनी व्यवहारासाठी वापरलं डार्क नेट; एनसीबीकडून तपास

By

Published : Oct 25, 2021, 12:28 PM IST

मुंबई -ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आर्यन खान आणि त्याच्या मित्रांबद्दल एनसीबीने नवीन दावा केला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हे लोक ड्रग्जशी संबंधित व्यवहारासाठी डार्क नेटवापरत असल्याचं तपासात उघड झालं आहे. आर्यन खानने स्वतः हे पैसे दिले होते किंवा आरोपींपैकी कोणी हे केलं होतं, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळाली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे, की एजन्सीने आरोपींकडून हायड्रोपोनिक तण जप्त केले आहे. ज्याची संख्या आता 20 आहे. ते डार्क नेटद्वारे खरेदी केले गेले आहेत. छाप्यांदरम्यान एनसीबीला काही आरोपींकडून एमडीएमए सापडले होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही ड्रग्ज बहुतांश युरोप आणि अमेरिकेतून आयात केलं जातं. एजन्सी आता हे ड्रग्ज आरोपींना कुठून मिळालं याची चौकशी करत आहे. हे ड्रग्ज मागवण्यासाठी डार्क नेटच्या माध्यमातून पैसे दिले जात होते, हे मात्र सांगण्यात येत आहे.

डार्क नेट म्हणजे काय?

डार्क नेट हे एक गुप्त इंटरनेट पोर्टल आहे. ज्यात फक्त विशिष्ट सॉफ्टवेअर, कॉन्फिगरेशन इत्यादीद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो. क्रूझ छाप्याच्या तत्काळानंतर NCB ने डार्क नेट आणि बिटकॉइनचा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही. तथापि, आता एजन्सीने दावा केला आहे, की डार्क नेट कसा वापरला गेला आहे. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हल्लेखोरांनी डार्क नेटच्या माध्यमातून शस्त्रे खरेदी केल्याची प्रकरणं समोर आली आहेत. डार्क नेटवर बेकायदेशीर साहित्य सहज उपलब्ध असल्याच्या बातम्या आहेत.

आर्यनला ड्रग्ज सापडले नाहीत -

विशेष म्हणजे, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्जसह पकडला गेला नाही. तथापि, एनसीबी त्याच्यावर मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचा आरोप करत आहे. 3 ऑक्टोबर रोजी आर्यनसह आठ जणांना अटक केल्यानंतर, एजन्सीने अनेक छापे टाकले आणि एका महिन्यात 12 जणांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अचित कुमारचा समावेश आहे. ज्याने नुकतेच न्यायालयाला सांगितले की, त्याला ‘पेडलर’ म्हणून संबोधून त्याचे भविष्य खराब केले जात आहे. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, तो साथीच्या आजारामुळे लंडनमध्ये आणि भारतातील एका विद्यापीठात शिकतो. त्याच्या जामीन अर्जाला एनसीबीनेही विरोध केला आहे. तर एजन्सीने सांगितले की त्याला पेडलर संबोधले नाही. परंतु त्याच्या विरोधात काही पुरावे आहेत.

26 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी -

या प्रकरणातील आरोपी आर्यन खान, मर्चंट आणि धमेचा यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आर्यन खान सध्या मध्य मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. यापूर्वी एनडीपीएस न्यायालयाने त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि फॅशन मॉडेल मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. या तिघांना जामीन नाकारताना, विशेष न्यायालयाने म्हटले होते, की आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटवर प्रथमदर्शनी असे दिसून येते की तो नियमितपणे बेकायदेशीर अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होता. आर्यन खानला माहित होते की त्याचा मित्र आणि सह आरोपी अरबाज मर्चंटकडे ड्रग्ज आहेत.

हेही वाचा -नवाब मलिक म्हणाले 'फर्जिवाडा इथूनच सुरु होतो', समीर वानखेडेंची NDPS कोर्टात वादग्रस्त माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details