मुंबई -ड्रग प्रकरणी आता आर्यन खानच्या बँक खात्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ड्रग घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे खर्च केलेत का? हे तपासण्याचे काम सुरू आहे. एनसीबी अधिकारी स्वतः याचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चौकशी करिता एनसीबी अधिकाऱ्यांकडून काही प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार आता एनसीबी अधिकारी तपास करणार आहे. मुंबई क्रुझ ड्रग पार्टीप्रकरणी आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. तेव्हापासून तो सुरुवातीला एनसीबी कस्टडीत होता, त्यानंतर आता जेलमध्ये आहे.
हेही वाचा -'तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे'; एनसीबी अधिकाऱ्याने अनन्याला फटकारले
त्याच्या व्हॉट्स अॅप संवादात अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव उघडकीस आले आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्जबाबत चर्चा झाली होती. दोघांमध्ये ड्रग्ज मागवण्याबाबत चर्चा झाली होती. याचमुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे हिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. तिची सुमारे सात तास चौकशी झाली आहे. यावेळी या संभाषणाबाबत चौकशी झाली. याच संभाषणामुळे आर्यन याला जामीन मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे, एनसीबी अधिकारी आता आर्यन खान, अनन्या पांडे यांचा ड्रग अँगलने तपास करत आहे.
कोणत्या खात्यावरून पैसे दिले जायचे?
आर्यन याने ड्रग्जसाठी पैसे दिल्याचे उघडकीस आल्यास त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्याने ड्रग्जसाठी पैसे दिल्याचे उघडकीस आल्यास त्याच्या विरोधात गंभीर आरोप लागू शकतो आणि त्याला जामीन मिळण्यास अडचण होऊ शकते. यामुळे आता एनसीबी अधिकारी आर्यन यांच्या बँक खात्याचा तपास करत आहेत.
आर्यन खानला न्यायालयाचा पुन्हा झटका
आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याचा आरोप एनसीबीने केला आहे, त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे.