महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 26, 2021, 3:24 PM IST

Updated : Oct 26, 2021, 10:30 PM IST

ETV Bharat / city

Aryan Khan Drug Case : आर्यन खान जामीन अर्जावरील आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा सुनावणी

Aryan Khan
आर्यन खान

19:39 October 26

मनीष राजगारीया NDPS कोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई - क्रूझ ड्रग प्रकरणातील आरोपी मनीष राजगारीयाला NDPS कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचे वकील अजय दुबे यांनी यासंदर्भात माहिती दिली.    

18:10 October 26

आर्यन खान जामीन अर्जावरील आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा सुनावणी

मुंबई - आर्यन खान जामीन अर्जावरील आजची कारवाई स्थगित झाली आहे. उद्या जामिनावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

17:48 October 26

मुकूल रोहतगी यांचा युक्तीवाद संपला

मुकूल रोहतगी यांचा युक्तीवाद संपला, अॅड. अमित देसाई अरबाज मर्चंटच्यावतीने बाजू मांडत आहेत. न्यायमूर्ती सांबरे म्हणतात की, तातडीच्या बाबी असतील तर ते नमूद करू शकतात. तसेच संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच कोर्टाचे काम सुरू राहणार आहे.

17:38 October 26

आर्यन खान आणि अचित यांच्यात फक्त पोकर गेमबद्दल चर्चा, रोहतगी यांचा दावा

आर्यन खान आणि अचित यांच्यात फक्त पोकर गेमबद्दल चर्चा झाली, असा दावा रोहतगी यांनी केला. त्यांची चॅटिंग अमित देसाई यांनी न्यायालयासमोर सादर केली आहे.  

17:28 October 26

आर्यनने ड्रग्जचे सेवन केले नाही, मग 20 दिवसांपासून तो कारागृहात का? - रोहतगी

आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केलेले नाही. तसेच त्याच्याकडे ड्रग सापडलेही नाही. मग मागील 20 दिवसांपासून आर्यनला कारागृहात का ठेवण्यात आले आहे, असा सवाल मुकूल रोहतगी यांनी विचारला.

17:22 October 26

आर्यन फक्त अरबाजला ओळखतो, इतर आरोपींना नाही - रोहतगी

एखादा व्यक्ती जर ड्रगचे सेवन करत असेल तर त्याला तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले जाते अशी कायद्यात तरतूद आहे. आर्यन खानचे चॅट दुसऱ्या व्यक्तीसोबतचे आहे. त्याचा क्रूझ ड्रगशी काही संबंध नाही. आर्यन खान हा अरबाज मर्चट व्यक्तीरिक्त इतर कोत्याती आरोपीला ओळखत नसल्याचा युक्तिवाद मुकुल रोहतही यांनी केला आहे.  

17:08 October 26

आर्यनच्या whats app चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी कोणताही संबंध नाही- रोहतगी

मुंबई -कोर्टाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाईलमधील whats app चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानची चॅटिंग ही सगळी क्रूझ पार्टीच्या आधीची असल्याचा दावा रोहतगी यांनी केला.

17:04 October 26

पंचनाम्यात मोबाईल जप्त केल्याचा उल्लेख नव्हता - रोहतगी

मुंबई - पंचनाम्यात मोबाईल जप्त केल्याचा उल्लेख नव्हता. 2 ऑक्टोबरला काय घडले याबद्दल आम्हाला माहिती आहे. आम्ही तिथे कसे गेलो, आम्हाला कसे अटक करण्यात आली... कायद्यात अशी तरतूद आहे की, कमी प्रमाणात ड्रग मिळाले तर कमाल शिक्षा 1 वर्ष (तुरुंगवास) आहे -  मुकुल रोहतगी

16:52 October 26

कोणाच्यातरी बुटामध्ये काहीतरी सापडले, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही- रोहतगी

मुंबई -आर्यनविरोधात कट रचला जात आहे. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जात आहे. कोणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.

16:42 October 26

आर्यन खानच्या जामीना अर्जावर हायकोर्टात सुनावणे सुरु

मुकुल रोहतगी यांचा युक्तीवाद -  

आर्यन खान २३ वर्षीय तरुण आहे. तो California येथे शिकत होता. त्यानंतर तो मार्च २०२० मध्ये परत भारतात परतला.

क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यानला क्रूझवर गेस्ट म्हणून आमंत्रित केले होते.  

आर्यन खानकडे ड्रग्स सापडले नाहीत. तसेच त्याने ड्रग्सचे सेवन केले यासंदर्भात NCB पुरावे देऊ शकली नाही.

आर्यनची कोणतीही ड्रग्स संदर्भात मेडिकल चाचणी केली नव्हती

16:33 October 26

आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

मुंबई - आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. सध्या आर्यन खानच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत आहे.  

16:14 October 26

एनसीबीची बाजू मांडमारे एएसजी अनिल सिंग कोर्टात आले

मुंबई -एनसीबीची बाजू मांडमारे एएसजी अनिल सिंग कोर्टात दाखल झाले आहेत.

16:11 October 26

आर्यन खानचे वकील न्यायालयात दाखल

आर्यन खानचे वकील न्यायालयात दाखल

मुंबई - ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, वकील सतीश मानेशिंदे आणि आर्यन खानची इतर टीम न्यायालयात दाखल झाली आहे. थोड्याच वेळात पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे.

15:36 October 26

आर्यनची जामीन याचिका फेटाळण्यासाठी NCBचे जोरदार प्रयत्न

मुंबई -पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा NCBने केला आहे. याच कारणामुळे हा जमीन नाकारला जाऊ शकतो. NCB चा आरोप आहे की शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी पंच साक्षीदारांवर दबाव टाकला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जामीन अर्ज केवळ याच आधारावर फेटाळला जाऊ शकतो.

15:27 October 26

सुनावणी वेळी न्यायालयात गर्दी, संबंधितांनीच उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई -उच्च न्यायालयात आर्यन खान ड्रग केसची सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टरुममध्ये गर्दी झाली असल्याने केसशी संबंधित लोकांनी उपस्थित राहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. तसेच इतरांना कोर्टरुम बाहेर जाण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

15:04 October 26

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

मुंबई - ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयात फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. आज आर्यन खानला दिलासा मिळतो का, हे पाहावे लागणार आहे.

आज होणार उच्च न्यायालयात सुनवाणी -

मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती यांनी 26 ऑक्टोंबर रोजी यापुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते. उच्च न्यायालयात आज या प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद सुरू झाला आहे. त्यानंतर निकाल देण्यासाठी न्यायालय काही वेळ घेईल, अशी माहिती आहे. उच्च न्यायालय या महिन्याअखेरपर्यंतच नियमित कामकाजासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर दिवाळीनिमित्त न्यायालयाला दोन आठवड्यांची सुट्टी आहे.

2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यनला 'कॉर्डेलिया द इम्प्रेस' नावाच्या क्रूझवरून एनसीबीने अटक केली. त्यानंतर 17 दिवस उलटून गेले, पण ड्रग्ज प्रकरणात आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. शाहरुखचे कुटुंबही तणावात आहे. एनसीबीला आर्यनकडून ड्रग्ज मिळालेले नाही, असा दावा आर्यनच्या वकिलांकडून केला जात आहे. पण एनसीबीने न्यायालयात दावा केला की आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनचा व्हाँट्सअप संभाषण -

आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही संभाषण लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे संभाषण एनसीबीच्या हाती लागले आहेत. यामध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अंमली पदार्थांबाबत चर्चा झाली होती.

आर्यन खान प्रकरणी नवा खुलासा -

या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, गोसावीच्या सांगण्यावरुनच तो पिवळ्या गेटजवळ गेला होता. समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये द्यायचे आहेत, असे म्हणताना त्याने ऐकल्याचा दावा केला आहे. एनसीबीने त्यांना साक्षीदार बनवून 10 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. तसेच पैशांनी भरलेल्या बॅगेचा उल्लेखदेखील केला असल्याचा खुलासा त्याने केला आहे. समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांच्यावर त्याने वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत.

Last Updated : Oct 26, 2021, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details