महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अरविंद सावंत यांनी दिला केंद्रीय अवजड मंत्रिपदाचा राजीनामा - Arvind Sawant to resign

शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे.

अरवींद सावंत देणार अवजड उद्योग मंत्री पदाचा राजीनामा

By

Published : Nov 11, 2019, 8:35 AM IST

Updated : Nov 11, 2019, 3:49 PM IST

मुंबई -राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष वाढतच आहे. भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना एनडीए सरकारमधून बाहेर पडत आहे. तसेच शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. आता केंद्रीय उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले.

अरवींद सावंत देणार अवजड उद्योग मंत्री पदाचा राजीनामा

याबाबत ते ट्विट करून सावंत म्हणाले की, शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपने फारकत घेतली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

अरवींद सावंत देणार अवजड उद्योग मंत्री पदाचा राजीनामा
Last Updated : Nov 11, 2019, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details