मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुनावणी सुरू आहे. न्यायालयाकडून सुनावणीवर तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यातच सरन्यायाधीश रामण्णा सेवानिवृत्त होत आहेत. शिवसेनेचे यामुळे टेन्शन वाढले असून, आम्हाला न्याय कोण देणार, अशी खंत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील अनेक निर्णयांवर त्यांंनी योग्य निर्णय दिल्याने, शिवसेनेला सरन्यायाधीश रमणा ( Supreme Court, Chief Justice N. V. Ramana ) यांचा खंडपीठावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर शिवसेनेची चिंता वाढली आहे. याचीच खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.
शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद एन. व्ही. रमाण्णा यांच्या खंडपीठापुढे : बंडखोर नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत राज्यात सरकार स्थापन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिंदे यांच्यासहित 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, सरन्यायाधीश एन. व्ही. रमाण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होत आहे.
शिवसेनेची चिंता वाढली : सरन्यायाधीश रमणा यांनी शिंदे गटाच्या वकिलांना पक्ष, संविधान आणि कायद्यातील कलमातून कात्रीत पकडले आहे. शिवाय, गोंधळलेल्या शिंदे गटाच्या वकिलांकडून लिखित म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. सलग दोन दिवस झालेल्या सुनावणीनंतर ८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, सोमवारची ८ तारीखदेखील पुढे गेली असून, १२ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
सर न्यायाधीश रमाण्णा होणार 26 ऑगस्टला सेवानिवृत्त : २६ ऑगस्टला सरन्यायाधीश रमणा सेवानिवृत्त होत आहेत. शिवसेनेने यावरून चिंता व्यक्त केली आहे. कारण शिंदे गटाच्या वकिलांना सरन्यायाधीश रामण्णा यांनी कोंडीत पकडल्याने शिंदे गटाची चिंता वाढली होती. तरी त्यावर अजून सुनावणी चालूच आहे. आता ८ ऑगस्टला होणारी सुनावणी लांबली असून, ती 12 ऑगस्टला होणार आहे. परंतु, सर न्यायाधीश रमाण्णा हे लवकरच 26 २६ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे.