मुंबईमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह Arvind Sawant on New Shivsena bhawan शिवसेनेच्या जवळपास 40 आमदार व बारा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेचा New shivsena bhawan controversy धनुष्यबाण नेमका कोणाचा? हा वाद चर्चेत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून यावर निर्णय घेणे बाकी आहे. धनुष्यबाण नेमका Arvind Sawant criticize eknath shinde कोणाचा तो उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. मात्र, या वादात आता आणखी एका वादाची भर पडण्याची शक्यता आहे, ती म्हणजे शिवसेना भवनाची. धनुष्यबाणा नंतर आता शिंदे गटाने आपला मोर्चा शिवसेना भवनाकडे वळवला आहे. आम्ही दादरमध्ये नवीन शिवसेना भवन उभारण्याचा विचार करत आहोत, असे वक्तव्य बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे.
हेही वाचाVinod Tawade हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे विनोद तावडेंचे आवाहन
मुर्खांचे नंदनवनयावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक मुर्खांच्या नंदनवनात राहतात. हा त्यातलाच प्रकार आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी हे बोलू नये. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे, आमदार - खासदारांची नाही. आणि त्याचा प्रत्यय या सर्वांना पुढच्या निवडणुकीमध्ये नक्की येईल, असे सावंत मुंबईत शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.