मुंबई -आज खरी शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशाच्या घटनापीठाने अरुणाचल प्रदेशमधील नबाम रेबिया प्रकरणात ( Nabam Rebia case ) दिलेला निकाल शिवसेनेला लागू होतो, असे कायदेतज्ञ मुंबई व सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट नितीन सातपूते ( Legal expert Nitin Satpute ) यांनी म्हटले आहे.
शिवसेना वाद कोर्टात - शिवसेना या पक्षातून फुटून ४० आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले ( formed government with BJP support ) आहे. यापैकी १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून ( Shiv Sena demands suspension action of 16 MLAs ) करण्यात आली आहे. तर आम्ही शिवसेना सोडली नाही असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या गटाने दोन तृतीयांश बहूमत असल्याने आमचीच खरी शिवसेना असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजुंकडून कागदपत्रे आणि पुरावे मागितले असून आज त्यावर सुनावणी होणार आहे. यासाठी ३ न्यायाधीशांचे बेंच बनवण्यात आले आहे.