महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

President Kovind In Mumbai : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन.. राज्यपाल कोश्यारी, आदित्य ठाकरेंनी केले स्वागत - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईमध्ये आगमन झाले ( President Ram Nath Kovind Arrived In Mumbai ) आहे. विशेष विमानाने आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governer Bhagat Singh Koshyari ) आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन.

By

Published : Feb 10, 2022, 5:09 PM IST

मुंबई -भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) विशेष विमानाने सपत्नीक आगमन ( President Ram Nath Kovind Arrived In Mumbai ) झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governer Bhagat Singh Koshyari ), राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांनी त्यांचे स्वागत केले.

विविध अधिकारी होते उपस्थित

राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यावेळी उपस्थित होते.

दरबार हॉलचे होणार उदघाटन

राष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी मुंबईतील राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन ( Durbar Hall Inauguration ) होणार आहे. तसेच 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रत्नागिरी जिल्ह्यातील अंबाडवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर येथे भेट देणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details