महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Monsoon in Maharashtra: मुंबईत पावसाची दमदार हजेरी; सखल भागात पाणी साचले - पावसाचा लोकल सेवेला फटका

गुरुवारी पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली. काही सखल भागात पाणी साचले. दरम्यान पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस ( Heavy rains in the Konkan coast ) पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

monsoon
मान्सून

By

Published : Jul 1, 2022, 11:05 AM IST

मुंबई -मान्सूनने महाराष्ट्रात आगमन ( Monsoon arrives in Maharashtra) केले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. दरम्यान, हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार राजधानी मुंबईला ही पावसाने झोडपून काढले. तसेच, मध्य भारतात मध्य प्रदेश, मध्य आणि पूर्व महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या बहुतांश भागात परवा अंशतः ढगाळ आकाश दिसून आले आहे. कोकण, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये मॉडरेट क्लाउड बँड आढळले आहेत. या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईत बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात - गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला ( rain affects on local train ) . तर मुंबईत काही सखल भागात पाणी साचले. दरम्यान पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस ( Heavy rains in the Konkan coast ) पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. बुधवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. गुरुवारी जोरदार पाऊस बरसला. यामुळे सायंकाळ पर्यंत मिलन सबवे वगळता कुठेही पाणी साचले नव्हते. मात्र रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता,काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मुंबईकर नागरिकांना आपले घर गाठावे लागले.

पावसाची जोरदार हजेरी -मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाच्या सरी पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गरुवारी सकाळी ८ ते आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मुंबई शहरात १७९.१३, पूर्व उपनगरात १०९.०६ तर पश्चिम उपनगरात १४०.५८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान आज शुक्रवारी १ जुलै रोजी दुपारी १.४६ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. या दरम्यान ४.२५ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. यावेळी नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात किंवा समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल सेवा ठप्प -मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही जोरदार बरसला. याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. काल गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास दादर येथे पॉइंट फेलीयरमुळे लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून ठाणे कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. याचा फटका कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रात्री १०.१० वाजता सुमारे दीड तासाने लोकल सेवा सुरू झाली. मात्र लोकल सेवा धिमा गतीने सुरू असल्याने प्रवशांचे हाल झाले.

५ दिवस मुसळधार -गुजरात व कर्नाटक किनारपट्टीत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज असल्याचे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसणार कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

पालिकेकडे पावसाची नोंद -मुंबई शहरात १७९.१३ मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली. पूर्व उपनगरात १०९.०६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. तर पश्चिम उपनगरात १४०.५८ मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली.

हेही वाचा -Special Session of Maha Legislature : विधानसभेचे विशेष अधिवेशन २ आणि ३ जुलै रोजी, बहुमत चाचणी होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details