मुंबई -राज्यभरात गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू आहे. यातच मुंबई उपनगरात गणेश मूर्तींचे आगमन होत आहे. मंगळवारी सांयकाळी विक्रोळी रेल्वे स्थानक पूर्वच्या गुरू दत्त गणेश मंडळाच्या विक्रोळीचा कैवारी गणेशाचे आगमन झाले.
गणेशाचे ढोलताशांच्या गजरात आगमन हेही वाचा - गणेशोत्सवानिमित्त जिल्हा पोलिसांकडून मुंबई-गोवा महामार्गावर चोख बंदोबस्त
सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी शहर रस्ते वाहतूक कोंडी,रस्त्यावरील खड्डे यातून सुटका करण्यासाठी आपापल्या गणेश मूर्तींचे आगमन गणेश मंडपाकडे करण्यास सुरुवात केली आहे. विक्रोळीतील श्री गुरू दत्त गणेश मंडळाच्या " विक्रोळीचा कैवारी" गणेशाचे हे 39 वे वर्ष आहे. मंडळ दरवर्षी गणेशोत्सव काळात वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते. मात्र, यावर्षी मंडळ साध्यापंध्दतीने उत्सव साजरा करणार आहे. इतर खर्च कपात करत जास्तीत जास्त रक्कम जमा करून पूरग्रस्त नागरिकांना देण्याचा निर्णय मंडळांनी यापूर्वीच घेतला आहे. मंडळाचे सदस्य नुकतेच कोल्हापूर, सांगली, येथे जाऊन जीवनावश्यक वस्तू पुरग्रस्तांना दिले असल्याचे मंडळाचे सदस्य मनोज बासुटकर म्हणाले.
हेही वाचा - भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गणेशमूर्तींचं वाटप