मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ( Underworld don Dawood Ibrahim ) टेरर फंडिंग करणाऱ्या आरोपीला राज्य दहशतवादी विरोधी पथकाने आज मुंबईतून अटक केली आहे. दाऊद इब्राहिम करिता परवेझ झुबेर हा आरोपी ( Parvez Zubair accused ) मुंबईत काम करत होता. अनधिकृत व्यवसायाच्या माध्यमातून मिळवलेले पैसे पाकिस्तानला पाठवत होता. असा संशय एटीएसला आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
Terror Funding Case : टेरर फंडिंग करणाऱ्या परवेझ झुबेरला एटीएसकडून अटक; 10 ऑगस्टपर्यंत कस्टडी - मुंबई सत्र न्यायालय
टेरर फंडिंग करणाऱ्या परवेझ झुबेर आरोपीला राज्य दहशतवादी विरोधी पथकाने आज मुंबईतून अटक ( Parvez Zubair accused ) केली आहे. एटीएसने UAPA कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे.
आरोपीला 10 ऑगस्टपर्यंत कस्टडी -मुंबई सत्र न्यायालयातील ( Bombay Sessions Court ) विशेष कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 10 ऑगस्टपर्यंत कस्टडी दिली आहे. एटीएस कडून या संदर्भातील सखोल तपास करण्याकरिता आरोपीची कस्टडी ची मागणी करण्यात आली होती. टेरर फंडिंग प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने परवेझ झुबेर नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. एटीएसने UAPA कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनीस इब्राहिम याच्यासह पाकिस्तानातील अतिरेकी कारवाईशी संबंधित व्यक्तीशी तो सतत संपर्कात होता. तसेच तो डी गँगसाठी निधी उपलब्ध करून देत होता. असा एटीएसचा आरोप आहे. तर परवेझ हा अनेक दिवसांपासून फरार होता.