महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Drug Case : गोरेगाव परिसरातून नायजेरियन ड्रग पेडलरला अटक; 97 लाखांचे ड्रग जप्त - नायजेरियन ड्रग पेडलरला अटक

शुक्रवारी (21 जानेवारी) गोरेगावच्या (Goregaon) आरे कॉलनी परिसरातून मूळचा नायजेरियन नागरिक (Nigerian held with drug) असलेल्या ड्रग पेडलरला अटक केली आहे. आरोपीकडून अंदाजे 970.7 ग्रॅम वजनाचा मेथॅक्वॅलोन (Methaqualone) नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

drug
नायजेरियन ड्रग पेडलरला अटक

By

Published : Jan 22, 2022, 5:07 PM IST

मुंबई -कांदिवली युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (21 जानेवारी) गोरेगावच्या (Goregaon) आरे कॉलनी परिसरातून मूळचा नायजेरियन नागरिक (Nigerian held with drug) असलेल्या ड्रग पेडलरला अटक केली आहे.

  • आरे कॉलनी परिसरातून अटक -

जोसेफ चिडिबेरे ओझोर इनुसा असे त्या आरोपीचे नाव असून, त्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतून गोरेगाव परिसरात ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी हा पेडलर आला होता, तेव्हा मुंबईतील आरे कॉलनी परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

  • 97 लाखांचे ड्रग पकडले -

आरोपीकडून अंदाजे 970.7 ग्रॅम वजनाचा मेथॅक्वॅलोन (Methaqualone) नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 97 लाख रुपये एवढी किंमत आहे. मुंबई व मुंबई उपनगरामध्ये आफ्रिकन वंशाचे परदेशी नागरिक कपडाविक्री व्यापारानिमित्ताने येऊन कोकेन, एमडी, मेरॉक्वॅलोन या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details