मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सचिन वझेंना अटक करण्याची मागणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सचिन वाझे हे व्यवसायाच्या निमित्ताने ओळखीचे असल्याचे सांगितले आहे. माझ्या पतीचा खून झाला असावा आणि तो सचिन वझे यांनी केला असावा असा मला संशय असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक केली जावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
सचिन वझेंना अटक करा, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मागणी हिरेन यांच्या पत्नीचा जबाब
अंबानींच्या घरासमोर सापडलेली कार सचिन वझे यांना चालवण्यास दिली होती. ही कार चार महिने सचिन वाझे यांच्याकडे होती असे त्यांनी जबाबात सांगितले आहे. सचिन वझे यांनी तीन दिवस माझ्या पतीची चौकशी केली. पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याचे तक्रारपत्र सचिन वझे यांनी माझ्या पतीकडून दाखल करून घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 3/3/21 ला माझे पती 9 वाजता घरी आले. त्यांनी मला सांगितले की सचिन वझे त्यांना अटक व्हायला सांगत होता असे त्यांनी जबाबात म्हटले आहे.
201 अंतर्गत वझेंना अटक करा
मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकशन विठ्ठल गावडे यांच्या इथले होते. 201 खाली सचिन वझे यांना अटक का झाली नाही असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या गाडीत झाली असून ती खाडीत टाकण्यात आली असावी असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. सचिन वझे यांना 201 खाली अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.