मुंबई :अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील (Umesh Kolhe Murder Case) फरार आरोपी शहिम अहमदला कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याकरिता येत असताना एनआयएने केलेली अटक (Umesh kolhe murder accused Shamim Ahmed arrest) बेकायदेशीर असल्याचा अर्ज आरोपीच्या वकिलांकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात देण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने निकाल देत एनआयएने केलेली अटक ही योग्य असल्याचा (Arrest of accused Shahim Ahmed in court premises) शिक्कामोर्बत केला (NIA Court On Accused Shamim Ahmed) आहे. आरोपी शहिम अहमद सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. (Shamim Ahmed in Court Custody) (Latest News from Mumbai) (Mumbai Crime)
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आरोपी शहिम अहमदला एनआयएने केलेली अटक योग्यच; कोर्टाचा निर्णय
आरोपी शहिम अहमदला कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याकरिता येत असताना एनआयएने केलेली अटक (Umesh kolhe murder accused Shamim Ahmed arrest) बेकायदेशीर असल्याचा अर्ज आरोपीच्या वकिलांकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात देण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने निकाल देत एनआयएने केलेली अटक ही योग्य असल्याचा (Arrest of accused Shahim Ahmed in court premises) शिक्कामोर्बत केला (NIA Court On Accused Shamim Ahmed) आहे.
आरोपी शमीमचा अर्ज फेटाळला :आरोपी शहिम अहमद हा अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांडातील फरार आरोपी होता आरोपीचे वकील आली काशीफ खान देशमुख यांचा आरोप होता की, आरोपीला विशेष कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याकरिता कोर्ट परिसरातील रजिस्टर विभागामध्ये कागदपत्र तयार करत असताना एनआयए च्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचे अर्ज न्यायालयासमोर देण्यात आला होता या अर्जावर दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. मात्र आज न्यायालयाने निकाल देत आरोपीला करण्यात आलेली अटक ही योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीच्या वतीने देण्यात आलेला अर्ज फेटाळून लावला आहे.
म्हणे, शमीमची अटक बेकायदेशीर -या प्रकरणात आरोपीच्या वतीने वकील अली काशीफ खान देशमुख यांनी असा एक युक्तिवाद केला की, आरोपी स्वतःहून न्यायालयासमोर स्वतःला आत्मसमर्पण करण्याकरिता आला होता. मात्र एनआयएने आरोपीला कोर्ट परिसरामध्ये न्यायालयीन कामकाजाचे डॉक्युमेंट तयार करत असताना अटक केली आहे. ही अटक कलम 279 अंतर्गत बेकायदेशीर असल्याचे युक्तिवाद आरोपीच्या वतीने आली काशीफ खान देशमुख यांनी केला होता. एनआयएकडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.