मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड उडली आहे. शिवसेनेना यावरुन आक्रमक झाली असून राज्यभर सह्यांची मोहिम राबवत आहेत. आज (मंगळवारी) शिवडी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेने तीव्र निषेध नोंदवला. दरम्यान, कंगनाचे डोके फिरले असून, देशाच्या स्वातंत्र्याचा तिने घोर अपमान केला आहे. पंतप्रधानांनी तिचा पद्मश्री किताब काढून घ्यावा, राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली तिला अटक करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, कंगना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली कंगनाला अटक करा; शिवसेना आक्रमक
सन १९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र भीक होती. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे, वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावत हीने केले होते. देशात यानंतर कंगनावर सडकून टीका केली जात आहे. राजकीय पक्षांनी कंगनाचा जाहीर निषेध नोंदवत, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
देशभरातून कंगनाच्या वक्तव्याबाबत संताप
सन १९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र भीक होती. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे, वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावत हीने केले होते. देशात यानंतर कंगनावर सडकून टीका केली जात आहे. राजकीय पक्षांनी कंगनाचा जाहीर निषेध नोंदवत, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनाही आक्रमक झाली असून मुंबईभर कंगना वक्तव्याच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम उघडली आहे. सोमवारी शिवडी विधानसभा मतदार संघातील निवांत घेरडे चौकात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. कंगनाचे डोके फिरले, देशाच्या स्वातंत्र्याचा केला घोर अपमान, अशा टॅगलाईनच्या बॅनरवर स्वाक्षरी करण्यात आली. तसेच तिचा पद्मश्री किताब काढून घ्यावा. तिच्यावर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करावी, अशी मागणी केली. नागरिक, व्यापाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला होता. आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, महिला संघटक शुभदा पाटील, नगरसेवक सचिन पडवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबईभर कंगनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आली.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- निलम गोऱ्हे
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनीही कंगनाला चांगलेच फटकारले आहे. पद्मश्री सन्मान मिळाल्यानंतर कंगनाने अत्यंत बेजबाबदारपणे विधान करत सुटली आहे. स्वातंत्र्य सैनिकांसोबत स्वातंत्र्य लढ्याचाही अपमान तिने केला आहे. त्यामुळे तिचा पद्मश्री किताब तात्काळ काढून घ्यावा आणि तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.
हा तर निर्लज्जपणाचा कळस - संजय राऊत
सगळे फासावर गेलेले क्रांतीकारक यांनी स्वातंत्र्य भीक म्हणून मिळवले आहे का? भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींनी या संदर्भात मत व्यक्त करावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. कंगनाला दिलेला किताब हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणार आहे. भाजपला याच्यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकारी केंद्र सरकारला राहीला नाही. जर या कंगनाकड़ून पुरस्कार मागे घेतले नाही तर कंगनाला लाज लज्जा पण नाही तिने माफी मागावी. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -देवेंद्रजी स्वप्न बघायचं बंद करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तुम्ही नाही.. मलिकांचा फडणवीसांवर घणाघात