महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अर्णबला मुंबई न्यायालयाचा दिलासा; अलिबाग न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही - अर्णबला मुंबई न्यायालयाचा दिलासा

अलिबाग दंडधिकारी न्यायालयासमोर शारीरिक दृष्ट्या हजर न रहण्याची परवानगी मागितली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अर्णब गोस्वामीला दिलासा दिला आहे.

Alibag
अर्णबला मुंबई न्यायालयाचा दिलासा

By

Published : Mar 5, 2021, 1:13 PM IST

Updated : Mar 5, 2021, 1:21 PM IST

मुंबई- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी अर्णव गोस्वामी यांनी अलिबाग दंडधिकारी न्यायालयासमोर शारिरीक दृष्ट्या हजर न रहण्याची परवानगी मागितली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गोस्वामींना दिलासा दिला आहे. आजच्या सुनावणीनुसार अर्णब गोस्वामींना अन्वय नाईक प्रकरणात अलिबाग न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या प्रकरणी अलिबाग न्यायालयाने यापूर्वी अर्णब गोस्वामीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर करून घेतला होता. मात्र, या प्रकरणातील सुनावणीसाठी अर्णब यांना न्यायालयात हजर रहावे लागणार होते.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी अलिबागच्या कोर्टात सुनावणीवेळी शाऱीरिक दृष्ट्या उपस्थिती न लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज न्यायालयाने प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित न राहण्याची मुभा दिली आहे.

Last Updated : Mar 5, 2021, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details