महाराष्ट्र

maharashtra

Salman Khan in the High Court केतन कक्कडने सोशल मीडियावर केलेले वक्तव्य बदनामीकारक असा सलमान खानच्या वतीने युक्तिवाद

By

Published : Aug 13, 2022, 9:41 AM IST

Updated : Aug 13, 2022, 12:16 PM IST

केतन कक्कड या व्यक्तीने Salman Khan in the High Court against Ketan Kakkad सोशल मीडियावर केलेली वक्तव्य हे आपल्या कुटुंबीयाविरोधात बदनामीकारक Ketan Kakkad remarks on social media आणि जातीय तेढ निर्माण करणारे आहे, असे युक्तिवाद सलमान खानच्या वतीने अ‍ॅड. रवी कदम यांनी काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान केले.

Salman Khan in the High Court against Ketan Kakkad
मुंबई उच्च न्यायालय सुनावणी सलमान खान

मुंबईकेतन कक्कड या व्यक्तीने सोशल मीडियावर Salman Khan in the High Court against Ketan Kakkad केलेली वक्तव्य हे आपल्या कुटुंबीयाविरोधात बदनामीकारक आणि जातीय तेढ निर्माण करणारे आहे, असे युक्तिवाद सलमान खानच्या वतीने अ‍ॅड. रवी कदम यांनी काल Ketan Kakkad remarks on social media मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान केले. या याचिकेवर Bombay High Court hearing Salman Khan पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.

हेही वाचाCase has been filed against shivsainik मोदी शहांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या 2 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

पनवेल येथील माझ्या फार्महाऊस जवळच असलेल्या भूखंडाचे मालक केतन कक्कड यांनी एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपली बदनामी केली. अशा प्रकारच्या अपमानकारक व्हिडिओला ब्लॉक करावे आणि तात्काळ हटवून टाकावे, असे अंतरिम निर्देश देण्याची विनंती सलमानने दिवाणी न्यायालयात याचिकेतून केली होती. सदर व्हिडिओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करताना ट्विटर, फेसबूक, यूट्यूब आणि गुगललाही सलमानने प्रतिवादी केले होते. मात्र, न्यायालयाने सलमानची मागणी फेटाळून लावली. शुक्रवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या.सी.व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणी पार पडली. निर्णयाला सलमानने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सलमानची तुलना बाबर आणि औरंगजेबशीकक्कड यांचा व्हिडिओ हा काल्पनिक असून केवळ बदनामीकारकच नाही तर सलमान खानविरोधात लोकांमध्ये जातीयदृष्ट्या भडकवणाराही आहे, असा दावा सलमानच्यावतीने अ‍ॅड. रवी कदम यांनी केला. तसेच, अल्पसंख्याक समुदायाचा सदस्य असलेला सलमान त्याच्या फार्महाऊस जवळील गणेश मंदिर बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे कक्कड म्हणाले. जिथे अयोध्या मंदिर उभारण्यासाठी 500 वर्षे लागली तर इथे सलमान खान गणेश मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, त्यांनी सलमानची तुलना बाबर आणि औरंगजेबशी केली असल्याचेही कदम यांनी सांगितले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो लोक सलमानविरोधात सोशल मीडियावर शेरेबाजी करत असल्याचेही अ‍ॅड. कदम यांनी सांगितले.

दाऊद आणि अमली तस्करीशी जोडला संबंधसलमान हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीचा सदस्य असल्याचे म्हटले असून, सलमान त्याच्या फार्महाऊसमधून अमली पदार्थांचा आणि मुलांच्या तस्करीचा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप कक्कड यांनी व्हिडिओतून केला असल्याचे अ‍ॅड. कदम यांनी युक्तिवाद करताना सांगितले. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी 22 ऑगस्ट पर्यंत तहकूब केली.

हेही वाचाएअर इंडियाच्या विरोधात याचिका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना औद्योगिक कामगार लवादाकडे दाद मागण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Last Updated : Aug 13, 2022, 12:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details