मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डिफॉल्ट जामीन प्रकरणात (Anil Deshmukh bail plea) दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज अनिल देशमुख यांचे वकील अॅडवोकेट विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद केला. देशमुख यांच्या जामिनावर 18 जानेवारी रोजी विशेष पीएमएलए कोर्ट निर्णय आहे. देशमुख यांच्या वतीने अॅड. अनिकेत देशमुख यानी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
Anil Deshmukh bail plea : अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर युक्तीवाद पूर्ण.. 18 जानेवारी रोजी न्यायालयाचा फैसला - अनिल देशमुख जामीन याचिका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डिफॉल्ट जामीन प्रकरणात (Anil Deshmukh bail plea) दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज अनिल देशमुख यांचे वकील अॅडवोकेट विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद केला. देशमुख यांच्या जामिनावर 18 जानेवारी रोजी विशेष पीएमएलए कोर्ट निर्णय आहे. देशमुख यांच्या वतीने अॅड. अनिकेत देशमुख यानी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
अनिल देशमुख यांच्या डिफॉल्ट जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली. काल (गुरुवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला होता. या युक्तिवादाला आज अनिल देशमुख यांचे वकील विक्रांत चौधरी आणि अनिकेत निकम यांनी उत्तर दिले. आता या याचिकेवर दोन्ही बाजूकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे 18 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालय अनिल देशमुख यांच्या याचिकेवर फैसला देणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना दिलासा मिळतो की नाही, हे महत्त्वाचे असणार आहे.
जामीन अर्ज अवैध, ईडीचे प्रतिज्ञापत्र -
अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला असून अनिल देशमुख यांनी दाखल केलेली जामिनासाठी अर्ज हा अवैध असल्याचे ईडीने सत्र न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. ईडीच्या म्हणण्याप्रमाणे 60 दिवसाच्या आत आरोप पत्र चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मागता येणार नाही, असे ईडीने मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
100 कोटी कधी प्रकरणात अनिल देशमुख यांना तिकडून अटक करण्यात आली होती तब्बल बारा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांना देखील सह आरोपी म्हणून आरोपपत्रात नमूद केले आहे.
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही मात्र याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे या करता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.