मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) परिसरातील ८० हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या झोपड्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, काम सुरु झाल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde On Redevelopment Huts ) यांनी दिली आहे.
पुनर्वसनाची अधिसूचना जारी
विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावातील शेर बदलास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम ३७ अन्वये मंजुरी देण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यानूसार विमानपत्तन प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाची कार्यवाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर ( Mumbai Metropolitan Region Development Authority ) नियोजित करण्यात आली आहे.