मुंबई -शिवसेना ठाकरे गटाकडून ( Shiv Sena Thackeray group ) ठाणे शहरात 200 कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात ( Appointments of Shiv Sena workers ) आल्या आहेत.या नियुक्त्या तीन विधानसभा क्षेत्रसाठी करण्यात आल्या आहेत. कोपरी पचपाखाडी,ओवळा माजीवाडा, ठाणे शहर आदि ठिकाणी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Appointments Shiv Sena workers : एकनाथ शिंदेंना चितपट करण्यासाठी शिवसेनेची नवी रणनीती - Shiv Sena new strategy
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) गटाला चितपट करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने ( Shiv Sena Thackeray group ) जोरदार तयारी केली आहे. ठाणे शहरात 200 कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात ( Appointments of Shiv Sena workers ) आल्या आहेत.
कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या -संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या नियुक्त्या शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आल्या आहेत. शिंदे यांचा ठाणे शहर हा बालेकिल्ला छेदण्याचा ठाकरे गटाची रणनीती ठरली आहे. शिवसेना शिंदे गटाला येणाऱ्या आगामी निवडणुकीत चितपट करणार का? हे येणारा काळच ठरवणार आहे,
शिवसैनिकांबरोबर तरुण शिवसैनिकांना संधी - या वेळी शिवसेनेने जुन्या शिवसैनिकांबरोबर तरुण शिवसैनिकांना ठाकरे यांच्या सेनेकडून संधी देण्यात आली आहे. तरुणांना संधी दिल्याने शिवसेनेला मोर्चे बांधणीसाठी मदत होणार आहे. आदित्य ठाकरे यांचा चाहता वर्ग तरुण असल्याने युवकांना संधी देण्यात आल्याची माहिती आमच्या सुत्रांनी दिली आहे