मुंबई -अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल ३ लाख २० हजार ७१० जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत २ लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील अवघ्या दोन लाख २ हजार ५८ विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडीचा पर्याय भरलेला आहे. यामुळे यंदा तब्बल १ लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी २३ ऑगस्ट ही शेवटची तारीख देण्यात आली. आज रात्री ११ वाजेर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत.
- २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित -
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने 14 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहेत. पहिल्या भागामध्ये अर्जाची नोंदणी करणे, लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवणे, अर्ज भाग एक भरणे, शुल्क भरणे, अर्जाची पडताळणी करणे यांचा समावेश होता. त्यानंतर १७ ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये त्यांना कॉलेजचे पर्याय भरणे, कोटा प्रवेशासाठी अर्ज करणे या बाबींचा समावेश होता. मुंबई विभागातून ३ लाख २० हजार ७१० जागांसाठी २ लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्येही २ लाख २० हजार ७६५ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले असून, त्यातील २ लाख १८ हजार ९४६ अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. अर्जांची पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख २ हजार ५८ विद्यार्थ्यांनी कॉलेजचे पर्याय भरलेले आहेत.
- शाखा निहाय उपलब्ध जागा-