महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अँटिलिया प्रकरणी यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे समाविष्ट करण्यासंदर्भात अर्ज - special nia court

मुकेश अंबानी यांच्या अँटालियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरणार सचिन वाझे यांच्यावर काही नवे आरोप लावत असल्याची एनआयएने कोर्टाला माहिती दिली आहे.

Antilia case mumbai
Antilia case mumbai

By

Published : Mar 24, 2021, 4:14 PM IST

मुंबई -उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या एसयूव्हीशी संबंधित केसमध्ये यूएपीए कायद्यांतर्गत अतिरिक्त गुन्हे समाविष्ट करण्याच्या संदर्भात अर्ज एनआयएने विशेष एनआयए कोर्टात दाखल केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटालियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरणार सचिन वाझे यांच्यावर काही नवे आरोप लावत असल्याची एनआयएने कोर्टाला माहिती दिली आहे. वाझेंची कोठडी उद्या संपत असल्याने एनआयएचा तातडीने अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला आहे.

हेही वाचा -मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर

वाझेंची कोठडी वाढवून घेण्याचा एनआयएचा प्रयत्न

नव्या कलमांखालील आरोपांत वाझेंची कोठडी वाढवून घेण्याचा एनआयएचा प्रयत्न पुढील कोर्टाच्या सुनावणीदम्यान असणार आहे. मुकेश अंबानी यांच्या घराच्या जवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार रिकव्हरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कोर्टाने 25 मार्चपर्यंत एनआयएच्या ताब्यात दिले आहे. शनिवारी 13 मार्चला रात्री उशिरा सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. एनआयने कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली. त्यानंतर कोर्टाने वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयएच्या ताब्यात पाठविले.

हेही वाचा -मुकेश अंबानींच्या घरासमोर गाडीत आढळलेल्या जिलेटिन कांड्यांचे नागपूर कनेक्शन

'हे एक मोठे षड्यंत्र'

एनआयएने कोर्टात सांगितले, की हे एक मोठे षड्यंत्र आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. एनआयएने कोर्टासमोर अतिशय महत्त्वाचे पुरावे सादर केले, ज्याआधारे वाझेंना अटक केली गेली. एनआयएने सांगितले की, सचिन वाझे यांना 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेले वाहन उभारण्यात आणि त्यामध्ये सामील होण्यास भूमिका बजावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घरी अँटिलियाजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काही कांड्या आणि धमकीदायक पत्र सापडले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details