मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक यांनी शिवडी न्यायालयासमोर जमवलेल्या गर्दीमुळे कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्याची तक्रार आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता भाजप नेते मोहित कंबोज यांनी याचिका दाखल केली होती. शिवडी न्यायालयाने कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांची मागणी फेटाळल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात शेवटी न्यायालयाच्या निर्णय विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती (petition against former minister Nawab Malik). आज मोहित कंबोज यांनी सत्र न्यायालयात केलेली याचिका मागे घेण्याकरता अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 16 सप्टेंबर रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मानहानीची याचिका -आर्यन खान प्रकरणानंतर नबाब मलिक ( Nawab Malik ) यांनी मोहित कंबोज यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी शिवडी न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक शिवडी कोर्टात हजर झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक जमवले असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली होती.