मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर ( Bollywood Actress Kareena Kapoor ) आणि तिची जिवलग मैत्रीण अमृता अरोरा ( Amrita Arora ) या दोघी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Positive ) आल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्रींना पालिकेने होम क्वारंटाईन ( Home Quarantine ) केले आहे. दोघींच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्याचा अहवाल उद्या (मंगळवारी) येणार आहे. दरम्यान मुंबईकर आणि सेलिब्रिटींनी कोरोना नियमांचे पालन करून स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महापालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) करण्यात आले आहे.
- 'दोन्ही अभिनेत्री होम क्वारंटाईन'
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर व तिची मैत्रीण अमृता अरोरा यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल (रविवारी) आला आहे. त्यात या दोन्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच पालिकेने या दोन्ही अभिनेत्रींना होम क्वारंटाईन केले आहे. त्यांची घरे सिल करण्यात आली आहेत. तसेच या दोघीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकी १५ लोकांची माहिती गोळा करून त्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या लोकांचे अहवाल उद्या येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
- 'नागरिकांनी गर्दीत जाऊ नये'