महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Cabinet Expansion महाराष्ट्रात सोडून या राज्यातील मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही - तेलंगणा राज्यातील मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही

शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. त्यानंतर राज्यसरकारमध्ये Maharashtra Cabinet Expansion महिलांना स्थान न मिळाल्याचा विषय जोरात चर्चेला जात आहे. मात्र, महाराष्ट्रातच नाहीतर दिल्ली, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश आणि अन्य काही राज्यांतही मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही apart from Maharashtra women have no place in the cabinet आहे.

eknath shinde devendra fadnavis
eknath shinde devendra fadnavis

By

Published : Aug 19, 2022, 7:35 PM IST

Updated : Aug 19, 2022, 8:36 PM IST

मुंबई -सध्या राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात '50 खोके एकदम ओके' सोबतच राज्यातील महिला अत्याचार व राज्याच्या मंत्रिमंडळात Maharashtra Cabinet Expansion महिलांना नसलेले स्थान, हे देखील विषय जोरात चर्चेला आहेत. या सर्वांवरून विरोधी पक्ष रोज शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरताना दिसतो. सभागृह सुरू होण्याअगोदर विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून या सर्व मुद्द्यांकडे सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधून घेत आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का? फक्त महाराष्ट्रात नाही तर आपल्या देशात आणखी देखील अशी राज्य आहेत जिथं एकही महिला मंत्री नाही. कोणती आहेत ही राज्य जाणून apart from Maharashtra women have no place in the cabinet घेऊया.


1. दिल्ली - दिल्लीत सध्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचे सरकार आहे. केजरीवाल यांनी आपल्या भाषणांमधून नेहमीच महिला सबलीकरण, महिलांचे न्याय हक्क यांच्या यासाठी आमचा पक्ष आणि सरकार काम करेल, असं वेळोवेळी सांगितले. पण, विशेष बाब म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही ही अतिशय धक्कादायक बाब आहे. आपच्या आमदार अतिशी मार्लेना यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशा चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू होत्या. मात्र, आता हे सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्षे होऊन गेले. पण, अद्यापही त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही.


2. तेलंगणा -दिल्लीनंतर नंबर लागतो तो तेलंगणा या राज्याचा. आंध्र प्रदेशला विभक्त करून नवीनच स्थापन झालेलं हे राज्य. त्यामुळेच सर्वात तरुण राज्य असे देखील या राज्याला म्हटलं जाते. तेलंगणाच्या विधानसभेत एकूण 119 सदस्य आहेत. म्हणजेच 119 आमदारांची ही विधानसभा. तेलंगणात सध्या टीआरएस म्हणजेच तेलंगणा राष्ट्र समितीचे सरकार असून के.सी.राव येथील मुख्यमंत्री आहेत. राव यांच्या सरकारमध्ये एकूण 17 कॅबिनेट मंत्री आहेत. पण, एकही महिला मंत्री नाही. यात उल्लेखनीय बाब म्हणजे राव यांनी सत्तेत आल्यावर महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केलं. पण, राव आपल्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान देण्याचे विसरले.



3. अरुणाचल प्रदेश -अरुणाचल प्रदेश हे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असलेले राज्य. पण, तुम्हाला विश्वास बसणार नाही, या राज्यात सुद्धा एकही महिला मंत्री नाही. ईशान्य भारतातील सर्वात मोठे राज्य अशी अरुणाचल प्रदेशची ओळख. या राज्यात एकूण 60 विधानसभा मतदारसंघ आहेत. म्हणजे 60 आमदारांचे हे राज्य 60 पैकी चार महिला आमदार आहेत. इतकच काय तर देशाला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याऱ्या राज्याचा मान देखील याच अरुणाचल प्रदेशला आहे. पण, दुर्दैव असं की राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या पेमा खंडू यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला कॅबिनेट मंत्री नाही.



4. सिक्कीम -सिक्कीम तसं पाहिलं गेलं तर देशातील एक छोटे राज्य. इथल्या विधानसभेत फक्त 32 आमदार आहेत. म्हणजेच इथे संपूर्ण राज्यात एकूण 32 विधानसभा मतदारसंघ पडतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कोकणातले फक्त चार जिल्हे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. इतकं हे छोटे राज्य. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथे तीन महिला आमदार निवडून आल्या. मात्र, येथील सध्याचे मुख्यमंत्री तमांग यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही.



5. मेघालय -मेघालयला आपण मातृसत्ताक पद्धती असलेले राज्य असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण येथे जवळपास 30 टक्के कुटुंबात महिला कुटुंबप्रमुख आहेत. कारण, या महिलांचा एकतर घटस्फोट झालेला आहे अथवा त्यांना नवऱ्याने सोडून दिले आहे. मात्र, त्यांची मुलं या महिलांसोबतच राहतात. त्यामुळे त्यांच्या मुलांची जबाबदारी ही या महिलांवरच आहे. आणि अशा राज्याच्या विधानसभेत एकूण 60 सदस्य संख्या असून, यात फक्त तीनच महिला आमदार आहेत. गंभीर बाब म्हणजे या राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात एकल महिला असताना या राज्यात एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे या महिलांच्या प्रश्नांचे नेमकं काय होतं? हा देखील एक प्रश्नच आहे.


6. पुद्दुचेरी -पुद्दुचेरी ज्याला आपल्या गावठी भाषेत पॉंडिचेरी देखील म्हटले जाते. सिक्कीमहून लहान राज्य म्हणजे पुद्दुचेरी या राज्यात फक्त तीसच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे सी. रंगास्वामी यांनी आता मे 2021 रोजी चौथ्यांदा या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. हे अतिशय छोटे राज्य असल्यामुळे व सदस्यांची संख्या देखील कमी असल्यामुळे इथं सहाहुन अधिक मंत्री होऊ शकत नाहीत. मात्र, सहा जणांचे मंत्रिमंडळ असलेल्या या राज्यात एक महिला मंत्री आहे.



7. कर्नाटक -कर्नाटक राज्याची एकूण विधानसभा सदस्य संख्या 222 आहे. 222 सदस्य असलेल्या राज्यात एकूण 30 मंत्री आहेत. तर, या राज्यात केवळ आठ महिला आमदार आहेत. यातील चार काँग्रेसच्या चार तर चार भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या महिला आमदार आहेत. सध्या कर्नाटकात बोंमाई यांचे सरकार असून त्यांच्या सरकारमध्ये केवळ एकच महिला मंत्री आहे. त्या एकमेव महिला मंत्री म्हणजे शशिकला.


तर, आता आपण पाहिलं की इतर राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर महाराष्ट्राकडे येऊया. 288 विधानसभा मतदारसंघ असलेल्या आपल्या राज्यात आत्ताच्या घडीला तब्बल 24 महिला आमदार आहेत. यातील 11 महिला भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. तर, शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना या मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, ज्या अठरा आमदारांचा शपथविधी झाला त्यात एकाही महिलेला स्थान नव्हतं.


दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये तब्बल तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान होतं. यात यशोमती ठाकूर (महिला व बाल विकास) व वर्षा गायकवाड (शालेय शिक्षणमंत्री) या कॅबिनेट मंत्री होत्या. तर, आदिती तटकरे या राज्यमंत्री होत्या. सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या फक्त कॅबिनेट मंत्र्यांनीच शपथ घेतली आहे. या सरकारचा आणखी मंत्रिमंडळ विस्तार होणे बाकी आहे. त्यामुळे आता नाही पण, पुढे तरी या विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळतं की नाही? हे येत्या काळात स्पष्ट होईल.



हेही वाचा -CM Eknath Shinde 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Aug 19, 2022, 8:36 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details