महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाप बेटे गजाआड जाणार, केंद्रिय संस्थांमधील वसुली एजंट येणार संकटात -संजय राऊत - संजय राऊत यांचे सूचक ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक सूचक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी बाप बेट्याबरोबरच तीन वसुली एजंटही तुंरुगात जातील याचा पुनरुच्चार केला आहे. सोमैयांच्या संदर्भात हे ट्विट असल्याचे मानले जात आहे. सोमैयांचा मुलगा नीलचा जामीन अर्ज काल फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नील संकटात येतील असा कयास लावला जात आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याचा संबंध नील यांच्याशी असल्याचा आरोप आधीच संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut

By

Published : Mar 2, 2022, 7:53 AM IST

Updated : Mar 2, 2022, 4:23 PM IST

मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन आज पुन्हा शिवसेना झुकणार नाही असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन बाप बेट्याबरोबरच आणखी तीन केंद्रिय संस्थांमधील वसुली एजंटही तुरुंगात जातील असे म्हटले आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आधीच सूतोवाच केले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा याप्रकारचे ट्विट केले आहे. त्यानंतर किरीट सोमैया यांचे पुत्र निल सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यावर संजय राऊत यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली आहे. बाप बेटे तुरुंगात जाणारच असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

नेमकं काय म्हणाले राऊत?

"ते नेहमी आम्ही काहीच केलं नाही असा आव आणतात. तुम्ही जर काहीच केलं नसेल तर अटक पूर्व जामीन अर्ज घेऊन न्यायालयात का गेलात ? कोणत्या गुन्ह्याखाली नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक होईल याची स्पष्टता नाही. मग, कशाच्या आधारावर त्यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला ?" असा प्रश्न शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणारे देखील लवकरच तुरुंगात -

राऊत म्हणाले की, "फक्त बाप भेटेच नाही आगामी काळात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणारे आणि त्यांना मदत करणारे अधिकारी देखील लवकरच तुरुंगात जातील. मी काय बोलतोय ते माझ्या शब्द लक्षात ठेवा."

केंद्राचे अधिकारी भ्रमात -

"गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून खंडणी आणि वसुली सारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना जर इथं आपलंच राज्य आहे असं वाटत असेल तर ते निव्वळ भ्रमात आहेत. महाराष्ट्र पोलिसांना देखील कारवाईचा अधिकार आहे. आणि मी हे ऑन रेकॉर्ड बोलतोय." असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ट्विटला सोमैयांचा संदर्भ

खा. राऊत यांनी किरिट सोमैया आणि त्यांचे पुत्र नील सोमैया यांच्यासंदर्भात हे ट्विट केल्याचे मानले जात आहे. कालच कोर्टाने किरीट सोमैया यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर राऊत यांनी हे ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटला या निकालाचा संदर्भ लावण्यात येत आहे.

शिवसेनाही आता आक्रमक

भाजप नेते करीट सोमैया यांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादीसह काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. वेळोवेळी त्याबाबत पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये सादर केले आहेत. तसेच ते पुरावे संबंधित तपास यंत्रणांनाही सोमैया यांनी दिले आहेत. त्यामुळे कारवायाही होत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी शिवसेनाही आक्रमक होताना दिसत आहे.

खा. राऊत यांनी केले होते सूतोवाच

खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन साडेतीन नेते लवकरच गजाआड असतील असे म्हटले होते. ते नेते कोण याचा खुलासा मात्र अजूनही झालेला नाही. राऊत यांनी अजूनही कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र संदर्भानुसार ही नावे कुणाची या चर्चेला राऊत यांच्या ट्विटने पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.

जर पिता-पुत्रांनी कोणताच गुन्हा केला नाही, तर ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात का धाव घेत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कर नाही त्याला डर कशाला अशा आशयाचे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. सोमैयांच्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केल्याचे एएनआयने नंतर स्पष्ट केले.

किरीट सोमैय्या यांचे पुत्र नील सोमैय्या यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दणका

भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांचे पुत्र भाजप नगरसेवक नील सोमैय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने काल (मंगळवार) फेटाळून लावला. किरीट सोमैय्या यांना मोठा दणका असल्याचे म्हटले जात आहे. न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

नील सोमैय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल

न्यायाधीश दीपक भागवत ( Judge Dipak Bhagwat ) यांच्यासमोर या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. नील यांच्याविरोधात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. मात्र असे असले तरी त्यांच्याविरोधातील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधीत कठोर कारवाई करण्याच्या 72 तास आधी नोटीस देण्यात द्यावी, अशी मागणी सोमैय्या यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ अशोक मुंदरगी यांनी केली. राज्य सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले, की नील सोमैय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही आश्वासन देता येणार नाही, असे राज्य सरकारकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले होते.

बाजारभावापेक्षा कमी किंमतीत जमीन खरेदी-

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात दररोज नवनवे घोटाळ्यांचा बाहेर काढण्याचा सपाटाच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्यांनी सुरू केला होता. त्या विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बाप बेटे जेल जाएंगे असा नारा दिला होता. किरीट सोमैय्या यांच्या मुलाने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत जमीन खरेदी केल्याचा दावाही केला होता. हा व्यवहार नीलच्या मालकीच्या निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून झाला असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अन्य एका प्रकरणात नीलला पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यातही बोलाविले होते. त्यामुळे आपल्याविरोधात एफआयआर दाखल होण्याआधीच नीलने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते, की निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमैयांची आहे. त्यांच्या कुटुंबियांशी आहे. त्यांचा मुलगा नील सोमैयांची आहे. तो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प त्यांनी मौजे गोखीवरे ता. वसई येथे उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमैयांनी ब्लॅकमेल केले. वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी सोमैयांवर केला होता

Last Updated : Mar 2, 2022, 4:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details