मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझीला २३ एप्रिलपर्यंत मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. रियाझ काजीला एनआयए कोठडी गरजेची नाही, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी कोर्टाला दिली. त्यामुळे सुनावणीनंतर कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रियाझ काझीची रवानगी केली. रियाज काझी यांची अनेक वेळा एनआयए (NIA)अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्यांनतर सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक करण्यात आली.
अँटिलिया स्फोटक प्रकरण : निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझीला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
अँटिलिया स्फोटक प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझीला २३ एप्रिलपर्यंत मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. रियाझ काजीला एनआयए कोठडी गरजेची नाही, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी कोर्टाला दिली. त्यामुळे सुनावणीनंतर कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रियाझ काझीची रवानगी केली.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने रियाझ काझी यांची चौकशी केली होती. सचिन वाझेच्या अटकेनंतर रियाझ काझी एनआयएच्या रडारवर आले होते. सचिन वाझे याचा सहकारी पीएसआय रियाज काझी याला एनआयएने कटात सामील असल्यामुळे व पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती आहे. मागील सुनावणीत मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने १६ एप्रिलपर्यंत त्यांना एनआयए कोठडी दिली होती.
पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. 9 जूनला सचिन वाझेंनी सीआययु पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.