मुंबई - मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात एनआयएने सर्वात मोठी कारवाई केली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं हा निर्णय दिला. अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांना मास्टरमाईंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
प्रदीप शर्मा यांचा विशिष्ठ करागृहात पाठवण्यासाठी एनआयए कोर्टापुढे अर्ज सादर केला. तुरुंग प्रशासनानं अर्जाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांत एनआयएची चौकशी तूर्तास पूर्ण झाल्याचं स्पष्ट आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा?
- एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख
- प्रदीप शर्मा यांचा जन्म 1 मे 1962 रोजी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे झाला होता.
- 312 एन्काऊंटरमध्ये सहभाग , 117 एन्काऊंटर स्वतः केले.
- भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुंबई पोलीस खात्यातून निलंबित.
- 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती.
- 35 वर्ष सेवा दिल्यानंतर जुलै 2019 मध्ये राजीनामा दिला.
- शिवसेना पक्षाकडून राजकारणात प्रवेश.
- 13 सप्टेंबर 2019 रोजी नालासोपारा येथून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र पराभव.
हेही वाचा -एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मांचा अँटिलिया 'गेम'; पोलीस उपनिरीक्षक ते शिवसेनेचे विधानसभा उमेदवार, अशी राहिली कारकीर्द
हेही वाचा -मनसूख हिरेन हत्या कशी झाली, नेमकं काय घडले 'त्या' रात्री, वाचा...
हेही वाचा -अँटिलिया स्फोटक प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; 'हे' आहेत खलनायक
हेही वाचा - प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हेच खरे सूत्रधार, NIA ला आधीपासून होता संशय