महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Drug Peddlers arrested from Dharavi : धारावीतून 60 लाखांचे ड्रग जप्त; दोघांना अटक - धारावीतून 60 लाखांचा चरस जप्त

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई सुरूच आहे. धारावी परिसरात चरस विकण्यासाठी (Charas recovered) आलेल्या दोन ड्रग तस्करांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने (Anti Narcotics Cell Bandra) रंगेहाथ पकडले आहे.

Anti Narcotics Cell bandra
धारावीतून दोन ड्रग तस्कर अटकेत

By

Published : Apr 16, 2022, 4:35 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई सुरूच आहे. धारावी परिसरात चरस विकण्यासाठी (Charas recovered) आलेल्या दोन ड्रग तस्करांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने (Anti Narcotics Cell Bandra) रंगेहाथ पकडले आहे. त्या दोघांकडे दोन किलो 25 ग्रँम वजनाचा चरस साठा सापडला आहे. 60 लाख 75 हजार रुपये इतकी त्या चरसची किंमत आहे.

दोघांना अटक - दोन तस्कर चरसचा साठा घेऊन धारावी कोळीवाडा बसस्टॉपजवळ येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी सापळा रचून सुनिल नायक आणि नेवाजी मिया या दोघांना पकडले. मुळचा राजस्थानचा असलेल्या सुनिलकडे एक किलो 10 ग्रँम तर बिहारच्या नेवाजीकडे एक किलो 15 ग्रँम चरस साठा सापडला. हा चरससाठा त्यांनी कुठून आणला व तो कोणाला विकणार होते याचा पोलीस शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details