महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Jitendra Navlane Case : जितेंद्र नवलाने यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल! - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जितेंद्र नवलानेंवर गुन्हा दाखल

मुंबईमध्ये ईडीच्या नावाने धमकी देत अनेकांकडून पैसे वसूल केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू होता. आज अखेर मुंबई लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र नवलाने यांनी राज्य सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या कारवाई लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन करिता याचिका दाखल केली होती.

ACB file Photo
ACB file Photo

By

Published : May 5, 2022, 8:34 PM IST

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलाने यांच्यावर पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केल्यानंतर आज ( गुरुवारी ) जितेंद्र नवलाने यांच्याविरोधात मुंबई लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे आता जितेंद्र नवलाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जितेंद्र नवलाने यांनी खासगी कंपन्यांकडून डीडीच्या अधिकाऱ्यांचे नाव वापरून मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली केली. त्यामुळे यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये म्हटले आहे, की जितेंद्र नवलाने यांनी 2015 ते 2021 परदेशी या कालावधीत दरम्यान 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये गोळा केला असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

जितेंद्र नवलाने यांच्याविरोधात कलम आठ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नियम 1988 व कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र नवलाने यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या वसुली करणारे एजंट म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. मुंबईमध्ये ईडीच्या नावाने धमकी देत अनेकांकडून पैसे वसूल केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू होता. आज अखेर मुंबई लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र नवलाने यांनी राज्य सरकारकडून त्यांच्यावर होत असलेल्या कारवाई लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन करिता याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते, की कुठलेही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करता येत नाही. तसेच कुठलेही अंतरिम जामीन देखील देण्यात येऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने जितेंद्र नवलाने यांची याचिका फेटाळून लावली होती. मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्हानंतर पुन्हा जितेंद्र नवलाने मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -Shiv Sena MP Bhavana Gawali : भावना गवळी यांनी ईडीकडे मागितली 15 दिवसाचा मुदत

ABOUT THE AUTHOR

...view details