मुंबई -क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर धाड टाकून NCB ने आठ जणांना ताब्यात घेतले होते. मुंबईत त्यानंतर एनसीबीकडून धाड सत्र सुरु आहे. आज आणखी एका नायजेरियन व्यक्तीला गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली. ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 20 झाली आहे.
मुंबईत शनिवारी रात्री २ ऑक्टोबरला एका क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली. याप्रकरणात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने त्यानंतर मुंबईत ड्रग्स पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणात 19 आरोपींना एनसीबीकडून अटक करण्यात होती. एनसीबीने गोरेगाव परिसरात छापा टाकून एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. ओकारो कॉझामा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून कोकेन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली.
Cruise Drug Party Case : क्रुझवरील ड्रग्स प्रकरणी गोरेगावातून एका नायजेरियन व्यक्तीला अटक - अमली पदार्थ विरोधी पथक
क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर धाड टाकून NCB ने आठ जणांना ताब्यात घेतले होते. मुंबईत त्यानंतर एनसीबीकडून धाड सत्र सुरु आहे. आज आणखी एका नायजेरियन व्यक्तीला गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली. ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 20 झाली आहे.
हे ही वाचा -Lakhimpur Case : केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्या - नवाब मलिक
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणी वेळी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळावा, अशी मागणी आर्यन खान यांच्या वकीलांनी केली होती. तर एनसीबीने आर्यन खानसह इतर १६ आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी, अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने एनसीबीची ही मागणी फेटाळून लावून आर्यनसह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आता २१ ऑक्टोबरपर्यंत आर्यनसह सात जणांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. मात्र, आर्यन खानच्या वकिलांनी सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. आरोपींच्या जामीन अर्जावर येथे सुनावणी झाल्यास आर्यन खानसहित दोघांना जामीन मिळतो की नाही, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.