मुंबई -भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे येत्या चार दिवसांत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. खडसे यांच्यासोबत जळगाव आणि इतर जिल्ह्यांतील अनेक भाजपा कार्यकर्तेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा असून या चर्चांना लवकरच पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना घेण्यावरून दोन माजी राज्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला होता. तो विरोध आता मावळला असल्याने राष्ट्रवादीकडून लवकरच खडसेंच्या प्रवेशाची घोषणा केली जाईल, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. खडसे यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांना विधान परिषदेत संधी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. भाजपाला रोखण्यासाठी खडसे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनाही फायद्याचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मागील आठवड्यात खडसे हे मुंबईत तळ ठोकून होते. यादरम्यान राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांशी खडसे यांच्यासोबत दीर्घ चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तर, मागील चार दिवसांपासून पवार आणि खडसे यांच्या भेटीची उत्सुकता राष्ट्रवादी आणि खडसे समर्थ कार्यकर्त्यांमध्ये लागली होती. मात्र या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्षात भेट झाली नसली तरी, वरिष्ठ स्तरावर त्यांची चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादीकडून कोणत्याही क्षणी घोषणा? - Khadse's ncp entry
भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. राष्ट्रवादीकडून कोणत्याही क्षणी ही घोषणा केली जाण्याची शक्यता पक्षातील एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.
खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासाठी मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदार तसेच मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठकी झाल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधातविधानसभा निवडणूक लढविणारे संजय गरुड, अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांचा देखील बैठकीत समावेश होता.खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भाजपासाठी तो मोठा धक्का ठरणार आहे. त्यासाठी भाजपामध्येही खडसेंच्या राष्ट्रवादीत होणाऱ्या प्रवेशासाठी काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहेत.