मुंबई -पराठा खायचा असेल तर १८ टक्के जीएसटी ( GST On Paratha ) भरावा लागणार आहे. तर चपाती खाण्यासाठी पाच टक्के कर लागणार आहे. देशात एकसमान वस्तू आणि सेवा कर ( GST ) प्रणालीला या वर्षी जुलैमध्ये पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र, जीएसटीची ( Goods and Services Tax ) गुंतागुंत काही कमी होतांना दिसत ( GST increased 18 percent ) नाही. जीएसटीची अंमलबजावणी तसेच अधिसूचना यावरून वाद होत आहेत. चपाती तसेच पराठ्यावरील वेगवेगळ्या जीएसटी दरांबाबतही सध्या चर्चा सुरु आहे.
पराठा महागला -पराठा (फ्रोझन) खायचा असेल तर त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल, तर चपाती खायची असेल तर ५ टक्के ग्राहकांना द्यावी लागणार आहे. पाकिटबंद चपाती -पराठ्यांवरील जीएसटीबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या उद्योगाशी संबंधित कंपन्यांचे म्हणणे आहे की, दोन्ही बनवण्याचे मूळ साहित्य गव्हाचे पीठ आहे, त्यामुळे त्यावर समान जीएसटी लागू झाला पाहिजे. वाडीलाल इंडस्ट्रीजने सांगितले की ते 8 प्रकारचे पराठे बनवतात. यामध्ये प्रामुख्याने पिठाचा वापर केला जातो. मलबार पराठ्यात पिठाचे प्रमाण ६२ टक्के, मिश्र भाजीपाला पराठ्याचे प्रमाण ३६ टक्के आहे.