महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anniversary Day Of NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन साजरा!

राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) पक्षाचा आज 23 वा वर्धापन दिन ( Anniversary Day Of NCP ) साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन, मुंबई ( Mumbai ) येथे १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षासाठी केलेल्या कामांमुळेच पक्षाला उभारी मिळाली, असे यावेळी जयंत पाटील यावेळी म्हणाले.

23rd Anniversary of NCP
राष्ट्रवादीचा वर्धापनदिन

By

Published : Jun 10, 2022, 4:55 PM IST

मुंबई -तुम्हा सर्वांचे कष्ट... प्रयत्न... जिद्द... यातूनच आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( NCP ) इथपर्यंत आला आहे. याची आम्हा सर्वांना जाणीव असून राष्ट्रवादी हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन, मुंबई ( Mumbai ) येथे १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.

नव्या पिढीला आशा - कार्यकर्त्यांच्या एकजुटीने पक्षाला मिळालेल्या उभारीबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. आपला पक्ष तेवीस वर्षांचा झाला आहे. आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रातील नव्या पिढीला भविष्यातील आशा दिसत आहे. अनेक तरूण पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत. आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरू आहे, हे पक्ष वाढण्याचे एकमेव कारण आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. २३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल, असा निर्धार केला होता याची आठवणही सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

शरद पवारांचे समर्थ नेतृत्व - पक्ष स्थापन झाल्यावर प्रांताध्यक्ष होण्याचा मान सर्वप्रथम मला मिळाला. राज्यात पक्षाची कोणतीही बांधणी नसताना काँग्रेस खालोखाल क्रमांक दोनचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला. तेव्हापासून पवार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करत आहोत, असे मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित करताना सांगितले. शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून राज्यात आरक्षण मिळवून दिले. या आरक्षणाला नख लावण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे. मात्र, त्याविरोधात आपण सक्षमपणाने लढा देतोय, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार शेखर निकम, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार माजिद मेमन, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, नरेंद्र राणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी नेते उपस्थीत होते.

हेही वाचा -Rajyasabha Polls : एआयएमआयएमकडे आम्ही मत मागितले नाही - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details