मुंबई -लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या घाटकोपर येथील घराचे स्मारक तयार करण्यासाठी जी समिती तयार केली होती. त्या समितीच्या कर्मचाऱ्यांना २० महिन्यापासून पगारच देण्यात आला नाही. यामुळे हे कर्मचारी १ ऑगस्टला चेंबूर येथील अण्णाभाऊंच्या स्मारकाजवळ सत्ताधारी नेत्यांना रोखणार आहेत.
अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कर्मचाऱ्यांना २० महिन्यापासून पगार नाही, १ ऑगस्टला चेंबूरमध्ये आंदोलन - अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्यामुळे हे कर्मचारी १ ऑगस्टला चेंबूर येथील स्मारकाजवळ सत्ताधारी नेत्यांना रोखणार आहेत.
पगार मिळावा, यासाठी या कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने केली. मात्र, त्यांचा पगार काही मिळाला नाही. अखेर गुरुवारी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नावरुन गोवंडी येथील स्मारक समिती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. कामाला लागलो तेव्हापासून एक रुपया ही सरकारने मोबदला दिला नाही. यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे लागत आहे. आता आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर त्यांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील सरकारवर या बाबत रोष व्यक्त केला.
अण्णाभाऊ यांच्या चेंबूर येथील स्मारका जवळ सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना येऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर या बाबत आपण शासनाला कामगारांच्या या प्रश्नाबाबत माहिती देऊन ही अजून संबंधित शासकीय विभागाकडून पगार आले नसल्याचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.