महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Parab Statement On ST Merger : एसटी विलनीकरणाचा निर्णय 22 मार्चला, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे परिवहनमंत्र्यांचे संकेत

एसटी विलनीकरणाबाबत ( ST Merger In State Government ) राज्य सरकार 22 मार्चला अधिवेशनात निर्णय घेईल. मात्र, जे कर्मचारी निर्णयाच्या विरोधात जातील, त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab On ST Merger ) यांनी दिली आहे.

एसटी विलनीकरणाचा निर्णय 22 मार्चला
एसटी विलनीकरणाचा निर्णय 22 मार्चला

By

Published : Mar 16, 2022, 6:57 PM IST

मुंबई -एसटी विलनीकरणाबाबत ( ST Merger In State Government ) राज्य सरकार 22 मार्चला अधिवेशनात निर्णय घेईल. मात्र, जे कर्मचारी निर्णयाच्या विरोधात जातील, त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab On ST Merger ) यांनी दिली आहे. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले अनिल परब -

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने भरघोस पगारवाढ दिली. ज्या गोष्टी अपेक्षित होत्या, त्या सर्व गोष्टी राज्यसरकारने कामगारांसाठी केल्या. मात्र, अद्यापही एसटी संपामुळे ग्रामीण भागात सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे संपावर असलेल्या एसटी कर्मचारी यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. तसेच जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

'राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्‍ती करायला हवी' -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदार अद्यापही राज्यपालांनी नियुक्त केलेले नाहीत. नियुक्तीबाबत नक्कीच राज्यपालांचे अधिकार आहेत. मात्र, आता राज्यपालांनी 12 आमदारांनी बाबत निर्णय घ्यायला हवा असं मत संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -Elephant Attacked : ...अन् चिडलेल्या हत्तीच्या हल्ल्यातून वनकर्मचारी थोडक्यात बचावले, पाहा VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details