मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनी ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस विभागातील बदली संदर्भातील यादी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. ती यादी मी गृहसचिव यांना दिली, असा जबाब त्यांनी ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशमुख यांच्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण ( Anil Deshmukh Accused Anil Parab ) झाली आहे.
ईडीला दिलेल्या जबाबात अनिल देशमुखांनी म्हटले आहे की, मी कोणत्याही प्रकारची बदल्यांची यादी दिली नव्हती. पोलीस बदली संदर्भात अधिकाऱ्यांची यादी अनिल परब यांनी दिली होती. त्या यादीवर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. अनिल परब यांनी ही यादी त्यांच्याशी निगडीत आमदारांकडून मिळायची. ती यादी अतिरिक्त गृहसचिव यांना देण्यात येत असे. तसेच, नियमात बसत असेल तर पुढील कारवाई करण्यात यावी, अन्यथा करु नये, असे सांगितल्याचे अनिल देशमुख ( Anil Deshmukh On Police Posting ) यांनी म्हटलं.