महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis connection with Iqbal Mirchi : इक्बाल मिर्चीकडून फडणवीसांनी 20 कोटी घेतले- ईडीकडे अनिल गोटेंची तक्रार - देवेंद्र फडणवीस दाऊद इब्राहिम तक्रार

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी ( BJP connection Dawood Ibrahim ) संबंधित मालमत्तेचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. मलिक हे सध्या मनी लाँड्रिंगच्या आरोपात ईडीच्या कोठडीत आहेत. तर मग देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा अशा प्रकारे कारवाई ( Anil Gote Dawood Ibrahim complaint )  करण्यात यावी, अशी मागणी अनिल गोटे यांनी आज ईडी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

अनिल गोटे
अनिल गोटे

By

Published : Mar 3, 2022, 8:32 PM IST

Updated : Mar 3, 2022, 9:15 PM IST

मुंबई- 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे ( Anil Gote allegation Devendra Fadnavis ) यांनी केला आहे. याबाबत अनिल गोटे यांनी गुरुवारी ईडीकडे तक्रार दाखल ( Anil Gote complaint at ED ) केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार गोटे यांनी ईडीकडे केली आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी ( BJP connection Dawood Ibrahim ) संबंधित मालमत्तेचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. मलिक हे सध्या मनी लाँड्रिंगच्या आरोपात ईडीच्या कोठडीत आहेत. तर मग देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा अशा प्रकारे कारवाई ( Anil Gote Dawood Ibrahim complaint ) करण्यात यावी, अशी मागणीअनिल गोटेयांनी आज ईडी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा कारवाई करा

हेही वाचा-'व्यक्तिगत अहंकारामुळे भाजपाला लागणार उतरती कळा'

गुरुवारपासून राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपकडून नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड संबंधाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून भाजप आणि इक्बाल मिर्चीच्या संबंधाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. अनिल गोटे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर सन 2014-15 मध्ये इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या कंपनीकडून भाजपला 20 कोटींची देणगी मिळाली होती.

हेही वाचा-Anil Gote Allegations On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस इक्बाल मिरचीचे लाभार्थी आहेत का; अनिल गोटे यांची ईडीकडे तक्रार

काय आहे माजी आमदार गोटेंचा आरोप?

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला आणि 1993 च्या मुंबई बाॅम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रा. लि ( RKW Developers Pvt Ltd ) आणि पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून ही देणगी देण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला. भाजपला मिळालेल्या या देणगीची तक्रार अनिल गोटे यांनी ईडीकडे केले आहे. अनिल गोटे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ईडीकडून कोणती पावले उचलली याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा-भाजपने माझ्यासोबत धोकेबाजी केली - अनिल गोटे

इक्बाल मिर्ची कोण होता?
मिर्चीच्या व्यवसायातून गुन्हेगारी जगतात आलेला इक्बाल मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या सहकाऱ्यापैकी एक होता. इक्बाल मिर्चीचा हृदयविकाराच्या झटक्याने 2013 मध्ये मृत्यू झाला होता. मृत्यूच्या 9 वर्षानंतरही मिर्चीची चर्चा सुरू असते. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात ईडीने मिर्चीविरोधात आरोपपत्र दाखल केले. हा आरोपी अमली पदार्थाची तस्करी करत होता. त्यानंतर दाऊदसाठी त्याने तस्करीचे काम सुरू केले असल्याचे म्हटले जाते. इक्बाल मिर्ची 1987 च्या सुमारास दुबईत पळून गेला होता.

Last Updated : Mar 3, 2022, 9:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details