महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh in Jail : अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी ( Anil Deshmukhs stay in jail extended ) होणार होती. मात्र, काही कारणामुळे अर्जावर सुनावणी ( Anil Deshmukhs bail plea hearing ) होऊ शकली नाही. त्यांच्या जामिन अर्जावर 11 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला ईडीने विरोध ( ED oppose Anil Deshmukh Bail ) केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Jan 7, 2022, 3:10 PM IST

मुंबई-अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील मुक्काम वाढणार आहे. 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अटक केल्यानंतर माजी गृहमंत्री देशमुख हे आर्थर रोड तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी 4 जानेवारी रोजी जामीनकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात ( Anil Deshmukhs bail plea hearing ) केला होता. आज सुनावणी होऊ शकली नसल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार ( Anil Deshmukhs stay in jail extended ) आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणामुळे अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या जामिन अर्जावर 11 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा-अनिल देशमुख यांनी बार मालकाकडून हफ्ता गोळा करायला सांगितले नाही - एसीपी संजय पाटील

जामीन अर्जाला ईडीचा विरोध
अनिल देशमुखयांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला ईडीने विरोध ( ED oppose Anil Deshmukh Bail ) केला आहे. अनिल देशमुख यांनी जामिनासाठी दाखल केलेले अर्ज हा अवैध असल्याचे ईडीने सत्र न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. ईडीच्या म्हणण्याप्रमाणे 60 दिवसांच्या आत आरोप पत्र चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मागता येणार नाही, असे ईडीने मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा-Anil Deshmukh Bail Application : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर 11 जानेवारीला सुनावणी


अनिल देशमुख यांचा मेहुणा आणि मुलगादेखील सहआरोपी

गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए ईडीने 7000 पानांचे पुरवणी आरोपपत्रदेखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांनादेखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखविले आहे.

हेही वाचा-Money laundering case : अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीनाला ईडीचा विशेष न्यायालयात विरोध

अटकेपासून संरक्षण मिळावे याकरिता न्यायालयात धाव-
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून दखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र याप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे याकरिता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरुच आहे.


काय आहे प्रकरण? ( Detailed Anil Deshmukh case )

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details