महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईडीकडून अनिल देशमुख यांचे मेडिकल चेकअप

ईडीकडून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे रुटीन मेडिकल चेकअप करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख यांना मेडिकल चेककरून ED कार्यालयात आणण्यात आले. ईडीने अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

By

Published : Nov 10, 2021, 3:49 PM IST

Updated : Nov 10, 2021, 3:55 PM IST

मुंबई -ईडीकडून आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे रुटीन मेडिकल चेकअप करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख यांना मेडिकल चेककरून ED कार्यालयात आणण्यात आले. ईडीने अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांचे रुटींग मेडिकल चेकअप

मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी शनिवारी अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीने त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टाने देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली आहे.

पीएमएलए कोर्टाने ईडीची कोठडी देण्याची मागणी फेटाळत देशमुख यांना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली. देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी असणार आहेत.

Last Updated : Nov 10, 2021, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details